Gold rate: देशात सोन्याची खरेदी रोडावणार

भारत सोने खरेदीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र सध्या सोन्याचे व्यवहार मागच्या दोन वर्षातील नीचांकी पातळीच्या जवळ गेले आहेत. पण सोन्याच्या आयातीची मागणी घटल्याने भारताची व्यापारी तूट कमी होऊन रुपयाला आधार मिळू शकतो.
Gold Rate
Gold RateAgrowon
Published on
Updated on

सध्या देशात महागाई (Inflation) वाढली आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत सोन्याची खरेदी (Gold Purchase) मंदावण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील सोने खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत एक चतुर्थांश कमी होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (World Gold Council) ही माहिती दिली आहे.

Gold Rate
Gold Market : सोने बाजारात २५ कोटींची उलाढाल

भारत सोने खरेदीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र सध्या सोन्याचे व्यवहार मागच्या दोन वर्षातील नीचांकी पातळीच्या जवळ गेले आहेत. पण सोन्याच्या आयातीची मागणी घटल्याने भारताची व्यापारी तूट कमी होऊन रुपयाला आधार मिळू शकतो.

Gold Rate
Gold Rate : सुवर्ण बाजार तेजाळला

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे भारतीय ऑपरेशन्सचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सोमसुंदरम पी आर यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं की, मागच्या दोन वर्षात कोरोना, लॉकडाऊनमुळे सोन्याच्या धंद्याचे कंबरडे मोडले होते. त्यातून हा धंदा कसाबसा सावरत मागच्या वर्षात रुळावर येत होता. मात्र सध्याच्या महागाईमुळे ग्रामीण भागात सोन्याच्या खरेदीत पुन्हा घट होऊ शकते.

सप्टेंबरमध्ये भारताचा वार्षिक चलनवाढीचा दर 7% च्या वर होता. त्यामुळे रिजर्व्ह बँकेच्या पुढच्या बैठकीत व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. भारतातील सोन्याच्या मागणीपैकी दोन तृतीयांश मागणी ग्रामीण भागातून होते. भारताच्या ग्रामीण भागात दागिने हा संपत्तीचा पारंपरिक स्रोत आहे.

सोमसुंदरम म्हणाले की, भारतात मागच्या डिसेंबरच्या तिमाहीत सोन्याची मागणी 343.9 टनांवरून सुमारे 250 टनांपर्यंत घसरण्याची शक्यता होती. या घसरणीमुळे 2022 मध्ये भारताचा एकूण सोन्याचा वापर सुमारे 750 टनांपर्यंत खाली येऊ शकतो, जो गेल्या वर्षीच्या 797.3 टनांच्या तुलनेत 6 टक्क्यांनी कमी आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, सप्टेंबरनंतरच्या तिमाहीत सणासुदीचा काळ असल्याने दागिन्यांची विक्रीत वाढ झाली. ही वाढ वर्षापूर्वीच्या तुलनेत 14% वाढून 191.7 टन झाली आहे. मागच्या दोन वर्षात परदेशातून केल्या जाणाऱ्या सोन्याच्या तस्करीत घट झाली होती. मात्र केंद्राने जुलैमध्ये मौल्यवान धातूवर आयात शुल्क वाढवलंय. यावर सोमसुंदरम म्हणाले की, "केंद्राने 18.5% आयात शुल्क लावल्यामुळे तस्करीची प्रवृत्ती वाढत आहे."

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com