Egg Rate : जास्त तापमानामुळे अंड्याचे भाव तेजीत

Team Agrowon

गेल्या महिन्यात दबाव आल्यानंतर अंडी दरात तेजी अनुभवण्यात आली. ही दरातील तेजी आताही कायम असून ५०६ ते ५१० रुपये प्रती शेकडा असा दर अंड्यांना मिळत असल्याची माहिती पोल्ट्री व्यावसायिकांनी दिली.

Egg Rate | Agrowon

राज्याची रोजची अंडी मागणी सरासरी एक कोटीच्या घरात आहे. तर दुसरीकडे शेतीपूरक तसेच स्वतंत्र पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांची संख्या ही ९ लाख आहे. त्यामुळे राज्यातील अंड्यांची गरज पूर्ण होत नसल्याने देशातील इतर भागातून देखील अंडी राज्यात दाखल होतात.

Egg Rate | Agrowon

सध्या तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने कोंबड्या जगविण्याचे मोठे आव्हान लेअर पोल्ट्री व्यावसायिकांसमोर आहे. पारा ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे.

Egg Rate | Agrowon

तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्री व्यवसायिकांना अनेक उपाययोजनांवर भर द्यावा लागत आहे. त्यानंतर देखील तापमान नियंत्रण साधले जात नसल्याने मर्तुकीचे प्रमाण वाढीस लागले आहे.

Egg Rate | Agrowon

जास्त तापमानाचा अंडी उत्पादनावर परिणाम झाल्याने अंड्याचे दर वधारले आहेत. सध्या अंड्यांना ५०६ ते ५१० रुपये प्रतिशेकडा दर मिळत आहे.

Egg Rate | Agrowon

एप्रिल महिन्यापर्यंत अंड्यांचे दर ३०० रुपयांवर होते. परिणामी उत्पादकता खर्चही निघत नव्हता, अशी स्थिती होती.

Egg Rate | Agrowon

तापमानात वाढीच्या परिणामी मर्तुक वाढल्याने हे दर आता वाढले आहेत. परिणामी पोल्ट्री व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.

Egg Rate | Agrowon

Bottle Gourd Juice: 'या' हिरव्या भाजीचा रस आहे आरोग्यासाठी अमृतसारखा