Alphonso Mango
Alphonso MangoAgrowon

Alphonso Mango Prices: हापूसच्या पेटीचा दर ६ ते ७ हजारांवर स्थिर

Mango Market: वाढते तापमान, ढगाळ वातावरण आणि धुके यामुळे यंदा हापूस आंबा उत्पादन अवघे २५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हापूसच्या पेटीचा दर ६ ते ७ हजारांवर स्थिर असून, प्रति डझन १८०० ते २००० रुपयांना विक्री होत आहे.
Published on

Sindhudurg News: वाढलेले तापमान, धुके आणि ढगाळ वातावरण यामुळे या वर्षी हापूस आंबा उत्पादन २५ टक्केच मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हापूस पेटीचा दर ६ ते ७ हजारांवर स्थिरावला आहे. सध्या स्थानिक बाजारपेठेत परिपक्व आंब्याला प्रति डझन १८०० ते २००० रुपये दर मिळत आहे. हेच दर यापुढे देखील कायम राहण्याची शक्यता आहे.

या वर्षीच्या हापूस हंगामाला काहीशी गती प्राप्त झाली आहे. आंब्याची आवक वाढली आहे. परंतु आंबा उत्पादन खूपच कमी येण्याचा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यातील आंबा मोहराला अपेक्षित फळधारणा झाली नाही. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मोहर आला. मात्र या कालावधीत धुक्यांचे प्रमाण वाढले.

Alphonso Mango
Mango Season : वाढत्या तापमानाचा आंबा पिकाला फटका

काही दिवस ढगाळ वातावरण देखील राहिले. मात्र सर्वांत मोठा फटका वाढलेल्या तापमानाचा बसला. मोहरासोबत आंब्याच्या लहान लहान फळांची गळ झाली. काही प्रमाणात आंबा करपला देखील. या सर्वांचा परिणाम आंबा उत्पादनावर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी २० ते २५ टक्केच उत्पादन येण्याचा अंदाज आंबा उत्पादकांकडून सांगितला जात आहे.

Alphonso Mango
Mango Crop Management : हापूसचा दर्जा राखण्यावर अधिक भर

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हापूसच्या आवकेत वाढ होत असली तरी अपेक्षित आवक अजूनही होताना दिसत नाही. त्यामुळे हापूसचे दर स्थिर आहेत. सध्या हापूसच्या चार डझनी पेटीला ६ ते ७ हजार रुपये दर मिळत आहे. तर देवगड स्थानिक बाजारपेठेत प्रति डझन १८०० ते २००० रुपयांनी आंबा विक्री केला जात आहे. आंबा उत्पादनाची स्थिती पाहता हेच दर पुढे कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील मोहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मे महिन्यात आंबा अत्यल्प प्रमाणात मिळण्याचा अंदाज आहे.

तापमानवाढीसह विविध नैसर्गिक आपत्तीचा आंब्याला फटका असला आहे. वांझ मोहराचे प्रमाण वाढल्यामुळे या वर्षी आंबा उत्पादनात मोठी घट होणार आहे. या वर्षी २० ते २५ टक्के उत्पादन मिळेल की नाही अशी स्थिती आहे.
अयोध्या गावकर, आंबा उत्पादक, पुरळ, ता. देवगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com