Onion Minimum Export Value : कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्याची अट तूर्त हटवली

Onion Market Update : देशांतर्गत कांद्याची उपलब्धता व ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने किमान निर्यात मूल्य ५५० डॉलर प्रतिटन ठेवले होते.
Onion
Onion Agrowon
Published on
Updated on

Nashik News : देशांतर्गत कांद्याची उपलब्धता व ग्राहकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने किमान निर्यात मूल्य ५५० डॉलर प्रतिटन ठेवले होते.

Onion
NAFED Onion Inspection : ‘नाफेड’च्या कांदा खरेदीची केंद्रीय पथकाकडून झाडाझडती

आता कांद्याची आवक कमी झाल्यानंतर शुक्रवारी (ता. १३) परकीय व्यापार महासंचालनालयाने कांद्याच्या निर्यात धोरणात पुन्हा बदल केला आहे. कांद्याच्या निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य ही अट पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ काढून टाकण्यात आली आहे. मात्र निर्यात शुल्काची डोकेदुखी कायम आहे.

Onion
Onion Market: बाजारातील कांदा आवक कमी झाल्याने दराला काहीसा आधार

परकीय व्यापार महासंचालक व पदसिद्ध अतिरिक्त सचिव संतोषकुमार सारंगी यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार किमान निर्यात मूल्य काढून टाकण्यात आले आहे. मात्र ४० टक्के निर्यात शुल्क कायम असणार आहे. त्यामुळे अजूनही कांदा निर्यात अटी-शर्तींच्या गुंत्यात अडकल्याची परिस्थिती आहे.

२८ ऑक्टोबर रोजी किमान निर्यात मूल्य प्रतिटन ८०० डॉलरची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर कांदा बाजारपेठ पुन्हा अस्थिर झाली होती. मात्र त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ४ मे २०२४ रोजी किमान निर्यात मूल्य ५५० डॉलर इतके करण्यात आले होते, मात्र असे असले तरीही सध्या निर्यात शुल्क ४० टक्के आहे. त्यात कमी करून २० टक्के करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे, मात्र अधिकृत याबाबत अद्याप शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com