US Import Duty
US Import DutyAgrowon

US Import Duty: भारतापेक्षा बांगलादेश, पाकिस्तानवर शुल्क कमी

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्ट रोजी भारतासह ७० देशांच्या आयातीवरील सुधारित शुल्क जाहीर केले. यात अमेरिकेच्या बाजारात कापडाचे प्रतिस्पर्धी असलेल्या बांगलादेश, व्हिएतनाम आणि पाकिस्तानवरील शुल्क भारतापेक्षा कमी करण्यात आले आहे.
Published on

Pune News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्ट रोजी भारतासह ७० देशांच्या आयातीवरील सुधारित शुल्क जाहीर केले. यात अमेरिकेच्या बाजारात कापडाचे प्रतिस्पर्धी असलेल्या बांगलादेश, व्हिएतनाम आणि पाकिस्तानवरील शुल्क भारतापेक्षा कमी करण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या कापड निर्यातीवर परिणाम होणार आहे. तसेच सुधारित आयात शुल्काची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून केली जाणार आहे.

अमेरिकेने जारी केलेल्या आदेशात केवळ भारतावरील आयात शुल्कात वाढ केलेली नाही. तर ट्रम्प यांनी विविध देशांवर १० ते ४० टक्के शुल्क आकारले आहे. यात सर्वाधिक आयात शुल्क सिरियावर ४१ टक्के लावले आहे. तसेच, युरोपियन युनियनमधील २७ देशांचाही समावेश आहे. जपानवर १५ टक्के, तर म्यानमार आणि लाओसवर ४० टक्के, युकेवर १० टक्के शुल्क आकारण्यात आले आहे.

US Import Duty
Edible Oil Import Duty: खाद्यतेल आयात शुल्क कपातीचा पुनर्विचार करा; सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी

कापड निर्यात कठीण होणार

अमेरिकन बाजारात प्रामुख्याने चार निर्यातदार देशांची स्पर्धा असते. चीन सर्वांत मोठा कापड निर्यातदार आहे. त्यानंतर व्हिएतनाममधून निर्यात होते. भारत तिसरा तर बांगलादेश चौथ्या क्रमांकावर आहे.

त्यानंतर पाकिस्तानमधून निर्यात होते. परंतु सुधारित आयात शुल्कानुसार व्हिएतनाम, बांगलादेश आणि पाकिस्तानपेक्षा भारतावर जास्त शुल्क लावले आहे. भारतावर २५ टक्के, तर बांगलादेश आणि व्हिएतनामवर २० टक्के, पाकिस्तानवर १९ टक्के शुल्क लावले आहे. त्यामुळे या देशांचे कापड अमेरिकेच्या बाजारात भारतापेक्षा स्वस्त मिळणार आहे. चीनवर ३० टक्क्यांच्या दरम्यान शुल्क असल्याचे सांगितले जाते. तरीही चीन भारताला धोबीपछाड देऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सोयापेंड निर्यातीवर परिणाम

अमेरिका जेवढे नॉन जीएम सोयापेंड आयात करते, त्यात भारताचा जास्त वाटा आहे. भारतानंतर कॅनडा आणि अर्जेंटिनातून नॉन जीएम सोयापेंडची अमेरिकेत आयात होते. ट्रम्प यांनी अर्जेंटिनावर १० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. तर कॅनडावर २५ ते ३५ टक्के शुल्क आकारणार असल्याचे जाहीर केले. पण कॅनडा अमेरिकेच्या जवळ असल्याने भारतापेक्षा काहीसे अधिक शुल्क असले तरी वाहतूक खर्च आणि वेळ कमी लागतो. त्यामुळे भारताच्या सोयापेंड निर्यातीवर परिणाम होणार आहे, असे जाणकारांनी सांगितले.

US Import Duty
Cotton Import: ब्राझीलमधून वाढतेय कापूस आयात; भारताची आयात जास्त, निर्यात कमी

कोळंबी निर्यात महाग होणार

अमेरिकेच्या बाजारात भारतातून मोठ्या प्रमाणात कोळंबी निर्यात होते. इक्वेडोर, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मेक्सिकोमधूनही कोळंबीची निर्यात होते. सुधारित आयात शुल्कात इक्वेडोरवर १५ टक्के, व्हिएतनामवर २० टक्के, इंडोनेशियावर १९ टक्के शुल्क लागू केले आहे. तसेच मेक्सिकोला आयात शुल्कात ९० दिवसांची सूट देण्यात आल्याचे मेक्सिको सरकारचे म्हणणे आहे.

रोजगार कमी होणार

कापड उद्योगात देशात मोठा रोजगार मिळतो. तसेच चमड्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने निर्मिती, दूरसंचार साधने, पोलाद आणि स्टील तसेच ऑटोमोबाईल उद्योगात कोट्यवधी लोक देशात काम करतात. परंतु अमेरिकेतील निर्यात कमी झाल्यास त्याचा निर्यातीवर परिणाम होऊ होत आहे. दागिने उद्योगाने सांगितले, की १० टक्के शुल्क लागू झाल्यानंतर देशात ५० हजार लोकांचा रोजगार गेला. २५ टक्के शुल्क लागू झाल्याने किमान १ लाख लोकांचा रोजगार जाणार आहे. इतरही मालाची निर्यात कमी झाल्यानंतर रोजगारावर गदा येणार आहे, असे जाणकारांनी सांगितले.

व्हिएतनाम, बांगलादेश, पाकिस्तानवर आपल्यापेक्षा कमी आयात शुल्क आहे. भारतात कापूस आयातीवरही ११ टक्के शुल्क लागू आहे. त्यामुळे दर जास्त आहेत. देशातील उद्योगाला अमेरिकेचे २५ टक्के शुल्क आणि भारत सरकारचे ११ टक्के कापूस आयात शुल्क आहे. म्हणजेच उद्योगाला एकूण ३६ टक्के शुल्काला तोंड द्यावे लागणार आहे. या परिस्थितीत उद्योगाला कापड निर्यात करणे अशक्य होणार आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा.
अतुल गणात्रा, अध्यक्ष, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com