कोल्हापूर : साखर उत्पादनात (Sugarcane Production) जगात दबदबा असणाऱ्या ब्राझीलमध्ये पुढील वर्षी ऊस उत्पादनात (Brazil's Sugarcane Production) घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी दुष्काळी (Drought) परिस्थितीमुळे उसाची लागवड (Sugarcane Cultivation) मोठ्या प्रमाणात घटल्याने गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा ब्राझीलमध्ये कमी ऊसगाळप (Sugarcane Cultivation) होईल असा अंदाज आहे. ब्राझील मधील शेतकरी सोयाबीन (Soybean) व मका (Maize) पिकाकडे वळत असल्याने उसाच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. ब्राझीलची शासकीय एजन्सी असलेल्या कोनॅबने ही शुक्रवारी (ता. १९) जाहीर केलेल्या नव्या अंदाजात ही माहिती दिली.
यंदाच्या ऊस हंगामात २०११ नंतर पहिल्यांदाच ऊस लागवडीचे क्षेत्र घटेल, असा अंदाज आहे. ब्राझीलमध्ये गेल्या दोन वर्षांत ऊस पिकासाठी फारसे समाधानकारक वातावरण नसल्याचे चित्र आहे. अपुरा व अवेळी पडणारा कमी पाऊस उसाचे उत्पादन घटवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. २०२१-२२ मध्ये सर्वात तीव्र दुष्काळ ब्राझीलमध्ये पडला. याचाच फटका ब्राझीलच्या ऊस उत्पादनाला बसला आहे. वाढीच्या वेळीच पावसाने दडी मारल्याने ब्राझीलमधील बहुतांशी उसाचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शेतकरी सोयाबीन व मका पिकाकडे वळत आहे. ही पिके कमी कालावधीची असल्याने शेतकरी या पिकांना प्राधान्य देत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
मुख्य केंद्र असलेल्या दक्षिण साखर पट्ट्यात केवळ ५१४ दशलक्ष टन ऊस उत्पादन अपेक्षित आहे, जे एप्रिलमध्ये अंदाजित ५३९ दशलक्ष टन सांगण्यात आले होते. २०११ मध्ये ४९३ दश लक्ष टन उसाचे गाळप झाले होते. गेल्या वर्षीपेक्षा साखर उत्पादन तीन टक्क्यापर्यंत कमी होईल अशी शक्यता आहे.
ब्राझीलमध्ये ४०० लाख टन साखर निर्मिती होईल असा अंदाज एप्रिलमध्ये व्यक्त करण्यात आला होता. शुक्रवारी (ता. २१) नव्या अंदाजानुसार हा आकडा ३३० लाख टनांपर्यंत कमी करण्यात आला आहे. हा अंदाज जर खरा ठरला तर यंदाही भारताला साखर उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर कायम राहण्याची शक्यता आहे.
भारताला आशा
जागतिक पातळीवर एजन्सीचे अंदाज हे साखर बाजातातील दर कमी जास्त होण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरत असतात. एप्रिलमध्ये ४०० लाख टन साखरेचा अंदाज व्यक्त केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर हे भविष्यातील अंदाजाच्या पार्श्वभूमीवर कमी होते. शुक्रवारच्या अंदाजानंतर मात्र याचा परिणाम साखरेचे दर काही प्रमाणात वाढण्यावर झाला. ब्राझीलमध्ये उसाचे घटते उत्पादन भारताच्या पथ्यावर पडू शकते. भारतामध्ये येणाऱ्या हंगामात ही चांगले ऊस उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
भारतात येणारा हंगाम केवळ दीड महिना अंतरावर आहे. ऑक्टोबर पासून देशातील साखर कारखाने ऊस गाळपास सुरुवात करतात. तत्पूर्वी केंद्राने जलद हालचाली करून पुढील हंगामाच्या साखर निर्यातीसाठी अनुकूल धोरण अवलंबणे गरजेचे आहे. पुढच्या हंगामाच्या साखरेसाठी मुक्त परवाना दिल्यास यंदाही मोठ्या प्रमाणात पुरेशी साखर देशाबाहेर जाऊन देशांतर्गत अतिरिक्त साखरेचा होणारा दबाव कमी होईल, असे साखर कारखानदारांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.