Brazil Sugar Market : ब्राझीलमध्ये हंगामाच्या पहिल्या दीड महिन्यात ऊस गाळप वाढले

Sugar Season Brazil : यंदा हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ब्राझीलमध्ये उसाचे गाळप व साखर उत्पादनही वाढले आहे.
Sugar Factory
Sugar Factory Agrowon

Sugar Market Update : यंदा हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ब्राझीलमध्ये उसाचे गाळप व साखर उत्पादनही वाढले आहे. गेल्‍या वर्षीच्या तुलनेत यंदाच्‍या मे महिन्यात ऊस गाळपाचे प्रमाण २८ टक्क्यांनी वाढले आहे. यंदा हवामान अनुकूल असल्‍याने उसाची तोडणी व गाळप वेगात होत असल्‍याचे चित्र आहे.

युनिका संस्थेच्या नुकत्याच प्रकाशित अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. यंदाचा हंगाम एप्रिलमध्‍ये सुरू झाला. सुरुवातीच्‍या सहा आठवड्यांपर्यंत (मे मध्य) दक्षिण मध्‍य क्षेत्रात ४३ लाख टन उसाचे गाळप झाले आहे, तर २५ लाख टनांहून अधिक साखरेचे उत्पादन झाले. ब्राझीलचा हंगाम संपेपर्यंत हाच ट्रेंड राहिला तर यंदा ब्राझील साखर उत्पादनात पुन्हा अग्रेसर बनू शकतो, असा अंदाज आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी या कालावधीचा साखर उत्पादन अंदाज २२ लाख टनांचा होता.

Sugar Factory
Sugar Market : देशातील साखर उत्पादन ३२१ लाख टनांवर

Sugar गेली दोन ते तीन वर्षे जागतिक बाजारपेठेत भारताचा वरचष्मा दिसून आला. भारतात साखरेचे वाढते उत्पादन व मोठ्या प्रमाणात होणारी निर्यात भारतीय साखरेचे महत्त्व वाढविणारी ठरली. ब्राझीलमध्ये चार वर्षांपूर्वी इथेनॉलला प्राधान्य देण्यात आले. यामुळे या देशातून साखरेचे उत्पादन घटले. यातच गेल्या वर्षी तिथे मोठा दुष्काळ पडला. इतर पिकांबरोबर उसालाही मोठा फटका बसला.

Sugar Factory
Makai Sugar Factory Election : करमाळ्यातील ‘मकाई’ची सत्ता चौथ्यांदा बागलांकडे

यामुळे साखरेचे उत्पादन खूप कमी झाले. रशिया युक्रेन युद्धाची झळ कमी झाल्‍यानंतर क्रूड तेलाच्या दरातही अनियमितता राहिली. याचा परिणाम इथेनॉलचे दर कमी होण्यावर झाला. यामुळे यंदाच्या हंगामात हंगामाच्या पूर्वाधात तरी ब्राझीलच्या साखर कारखान्यांनी साखर उत्‍पादनाला प्राधान्य दिल्‍याचे चित्र आहे.

हंगाम संपेपर्यंत कारखाने साखरनिर्मितीच अधिक करण्याला पसंती देतात की पुन्हा इथेनॉलनिर्मिती वेगात करतात या बाबत अनिश्चितता आहे. गेल्‍या वर्षी इथेनॉलचा अनुभव ब्राझीलला फारसा चांगला नव्‍हता. सध्या साखरेचा आंतराष्ट्रीय बाजार दराच्‍या बाबतीत विक्रमी पातळीवर गेला आहे. याचा फायदा उचलण्‍याचा प्रयत्न ब्राझीलचा असणार आहे.

खरेदीदार देश ब्राझीलकडे वळण्याची शक्यता

सध्‍या जगातून भारतीय साखरेला मागणी असली तरी केंद्राच्या धोरणामुळे साखर भारताबाहेर जाऊ शकत नसल्‍याची स्थिती आहे. या सर्व परिस्थितीचा लाभ ब्राझील निश्‍चित घेईल, असा अंदाज साखर उद्योगाचा आहे.

भारतीय बाजारपेठेने प्रतिसाद न दिल्‍याने भारताचे हक्काचे साखर खरेदीदार देशही त्यांच्या साखरेच्या गरजेसाठी ब्राझीलकडे वळतील, अशी शक्यता सध्या जागतिक बाजारपेठेत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com