Sugar Production : साखर उत्पादन गतवर्षीपेक्षा २३ लाख टनांनी घटणार

यंदाच्या हंगामात देशातील साखर उत्पादन गेल्या हंगामाच्या तुलनेत २३ लाख टनांनी कमी राहण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने हा अंदाज व्यक्‍त केला आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

Sugar Market Update कोल्हापूर ः यंदाच्या हंगामात देशातील साखर उत्पादन (Sugar Production) गेल्या हंगामाच्या तुलनेत २३ लाख टनांनी कमी राहण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने (All India Sugar Trade Association) हा अंदाज व्यक्‍त केला आहे.

गेल्या वर्षी ३५८ लाख टन साखर उत्पादन झाले होते, यंदा ते ३३५ लाख टनांपर्यंत कमी होईल, असा अंदाज असोसिएशनचा आहे.

असोसिएशनने यंदाच्या हंगामाच्या अगोदर ३४५ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज जाहीर केला होता.

पण विशेष करून महाराष्‍ट्र, कर्नाटकात अपेक्षेपेक्षा कमी साखर उत्पादन झाल्याने असोसिएशनने नव्या अंदाजात पहिल्या अंदाजापेक्षा १३ लाख टनांनी साखर उत्पादनात घट होईल, असे सांगितले आहे.

Sugar Production
Sugar Production : देशात २२८ लाख टन साखर उत्पादन; १७ कारखान्यांचा हंगाम संपला

२०२१-२२ हंगामात महाराष्ट्रात १३७ लाख टन उत्पादन झाले होते. या तुलनेत सुरू हंगामात महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन ११३ लाख टन इतके कमी होईल, असा अंदाज आहे.

कर्नाटक व उत्तर प्रदेशामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत बरोबरीने साखर उत्पादन सुरू आहे. मात्र अंतिम टप्प्यांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा कमी उत्पादन होऊ शकते. हीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ही उद्‍भवू शकते.

महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांमध्ये एक किंवा दोन शिफ्टमध्येच उसाचे गाळप सुरू आहे. याचाच अर्थ या कारखान्यांना ऊस कमी पडत असल्याचे दिसते. पूर्ण क्षमतेने गाळप सध्या होत नसल्याने येत्या काही दिवसांमध्ये अनेक कारखान्यांचा गाळप हंगाम गतीने बंद होईल.

याचा विपरीत परिणाम साखर उत्पादनावर होईल, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेश कर्नाटकामध्येही फारसे समाधानकारक चित्र नाही.

अगदी जेमतेम स्वरूपातच गाळप सध्या सुरू आहे. या आघाडीच्या राज्याच्या साखर उत्पादनातील घटीचा परिणाम देशाच्या साखर उत्पादनावर होणार आहे.

Sugar Production
Sugar Production : जगात यंदा साखर उत्पादन वाढणार

असोसिएशनने सुरुवातीच्या टप्प्यात ३४५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. गेल्या वर्षी इतकाच ऊस व चांगल्या पावसामुळे यंदाही ऊस उत्पादन व साखर उत्पादन चांगले होईल, असा तर्क होता.

पण यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून उसाच्या एकरी उत्पादनात तर घट झालीच पण रिकव्हरीमध्येही घट झाल्याने शेतकरी व साखर कारखानदार दोघांनाही नुकसान सोसावे लागत असल्याचे चित्र सध्या आहे. या पार्श्‍वभूमीवर असोसिएशनने हा घटीचा अंदाज जाहीर केला आहे.

...असे चित्र असू शकते

गेल्या वर्षीचा शिल्लक साखर साठा व यंदाचे उत्पादन असे मिळून देशात ऑक्टोबरअखेर ३९५ लाख टन साखर तयार होईल. यापैकी ६० लाख टन साखर निर्यात होईल. तर २७५ लाख टन साखरेची विक्री देशांतर्गत बाजारात होईल.

यानंतर पुढील हंगामाच्या प्रारंभावेळी सुमारे ६० लाख टनापर्यंत साखर शिल्लक राहू शकेल, असा अंदाज असोसिएशनचा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com