India Sugar Production 2025: देशात साखरेच्या उत्पादनात १८ टक्के घट

Sugar Industry Update: चालू हंगामात देशात साखरेचे उत्पादन १८ टक्क्यांनी घटले असून ऊस गाळप व उताऱ्यातही घट झाली आहे. मात्र देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याइतका साखर साठा उपलब्ध आहे.
Sugar Production
Sugar Production Agrowon
Published on
Updated on

New Delhi News: चालू हंगामात देशातील साखर उत्पादनात १८ टक्के घट झाली आहे. यंदा ऊस गाळप कमी झाले आणि साखर उताराही केवळ ९.३० टक्के मिळाला. कारखान्यांनी आतापर्यंत ९० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने ही माहिती दिली.

ऊस गाळपाच्या १५ मेपर्यंतच्या अहवालानुसार, देशातील साखर उत्पादन २५७ लाख ४० हजार टनांवर पोहोचले आहे. गेल्या हंगामात उत्पादन ३१५ लाख ४० हजार टन होते. म्हणजे यंदा उत्पादन ५८ लाख टनांनी कमी आहे. गेल्या हंगामात साखर उतारा १०.१० टक्के मिळाला होता. मात्र आतापर्यंत चालू हंगामात ९.३० टक्के साखर उतारा मिळाला.

Sugar Production
India Sugar Production: साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घसरले; उतारा केवळ ९.३० टक्के

म्हणजेच साखर उताऱ्यात ०.८० टक्का घट आली. याशिवाय उस गाळपही कमी झाले. चालू हंगामात १५ मेपर्यंत २ हजार ७६७ लाख ७५ हजार टन ऊस गाळप झाले. मात्र गेल्या वर्षी ३ हजार १२२ लाख ६१ हजार लाख ऊस गाळप झाले होते. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा ३५४ लाख ८६ हजार टनाने ऊस गाळप कमी आहे, असेही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने म्हटले आहे.

चालू हंगामाअखेर साखरेचे उत्पादन २६१.१० लाख टन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हंगामाच्या अखेरीस साखरेचा शिल्लक साठा सुमारे ४८ ते ५० लाख टन राहू शकतो. उत्पादन कमी झाले तरी देशातील साखरेचा साठा देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात वाढलेल्या ऊस लागवडीमुळे २०२५-२६ च्या हंगामात साखर उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे, असेही महासंघाने म्हटले आहे.

Sugar Production
Sugar Production Decline: राज्यात गेल्या वर्षीपेक्षा २९ लाख टनांनी साखर उत्पादनात घट

राज्यनिहाय साखर उत्पादन

यंदा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये साखर उत्पादनात सर्वाधिक घट आली. महाराष्ट्रातील उत्पादन २९ लाख टनांनी कमी होऊन ८०.९५ लाख टनांवर स्थिरावले. उत्तर प्रदेशातील उत्पादन जवळपास ११ लाख टनांनी घटून ९२.७५ लाख टनांवर आले. कर्नाटकातील साखर उत्पादनात ११ टन घट होऊन ते ४०.४० लाख टनांपर्यंत आले. तसेच गुजरातमध्ये १०.३० लाख टन उत्पादन झाले. तर उत्तराखंडमध्ये उत्पादनात काहीशी वाढ झाली. तमिळनाडू, बिहार आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्येही साखर उत्पादन कमी राहिले.

इथेनाॅल उत्पादनाची स्थिती

चालू हंगामात इथेनॉल उत्पादनासाठी ३२ लाख टन साखरेचा वापर होण्याचा अंदाज आहे. हे प्रमाण सुरुवातीच्या उद्दिष्टापेक्षा थोडा कमी आहे. उसाचा रस आणि बी-हेवी मोलॅसेसपासून उत्पादीत इथेनॉलच्या किमतीत सुधारणा न झाल्यामुळे ही कमतरता आहे. या परिस्थितीत थेट साखरेपासून निर्मिती अधिक आकर्षक पर्याय बनला आहे. त्यामुळे मोलॅसिसमधील साखर इथेनॉलकडे वळविण्याऐवजी अतिरिक्त तीन लाख टन साखरेचे उत्पादन झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com