Sugar Gathi : होळीचे हार, कंगणाचे दर वधारले; विक्रीस वेग

Holi Festival : हिंदू धर्मात होळी, रंगपंचमी या सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळी, रंगपंचमी म्हणजे एकमेकांतील भेदभाव विसरून एकत्र येत विविध रंगांची उधळण करण्याचा उत्सव.
Sugar Gathi
Sugar GathiAgrowon

Jalgaon News : हिंदू धर्मात होळी, रंगपंचमी या सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. होळी, रंगपंचमी म्हणजे एकमेकांतील भेदभाव विसरून एकत्र येत विविध रंगांची उधळण करण्याचा उत्सव. होळीसाठी लागणारे हार-कटे (साखरेपासून बनविलेले हार कंगण) बनवून त्याची विक्री करण्यास वेग आला आहे. साखर दरात वाढ झाल्याने हार- कंगणही महागले आहेत.

जळगाव शहरात अमळनेर येथील मुस्लीम कुटुंबीय हिंदू बांधवांना सोबत घेत होळी, गुढीपाडव्यासाठी लागणारे हार-कडे तयार करीत आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत साखर सहा रुपयांनी प्रती किलो महागली आहे. यामुळे हारकड्याच्या दरात वाढ झाली आहे. उद्या (ता.२४) होळी आहे. होळीला साखरेचा हार घालून पूजा केली जाते. लहान मुलींना साखरेचा हार, तर मुलींना कडे दिले जाते.

Sugar Gathi
Sugar Gathi Rate : गाठींचा गोडवा महागाईमुळे संकटात

गुढीपाडव्याला गुढीला साखरेचा हार कडे घातले जाते. हार कड्यांचा सध्या किलोचा दर १४० ते १५० रुपये आहे. साखर, कोळसा, दोरा, मजुरीचे दर वाढल्याने हे दर वाढले आहेत. होलसेलचे दर ९० ते १०० रुपये प्रतिकिलो आहेत.

अमळनेर येथील अजीज करीम हलवाई हे हार-कडे बनवितात. त्याचा छोटा व्यवसाय आहे. हा परिवार पाच पिढ्यांपासून मिठाई व्यवसायात आहे. अजीज यांच्या पणजोबांपासून हा व्यवसाय सुरू आहे. त्यांची परंपरा त्यांचे आजोबा अमीर यांनी जोपासली. त्यापाठोपाठ वडील करीम यांनी व्यवसायात प्रगती केली.

Sugar Gathi
Olam Sugar Factory : ओलम साखर कारखान्याकडून आता मका व तांदळापासून इथेनॉल निर्मिती

अजीज यांना त्यांची दोन मुले नासीर व आदिल, नातू, अझहरही मदत करतात. अजीज हलवाईवाले २६ वर्षांपासून येथील कासमवाडीत ‘न्यू मिलन हार कंगण’ या नावाने कारखाना महिनाभरासाठी जळगावमध्ये उभारतात. एका महिन्याला हजार किलोचा माल येथे तयार होतो. हा माल इतर व्यापारी नेऊन त्याची विक्री करतात.

हिंदू-मुस्लिम कारागीर एकत्र

अजीज यांच्या छोटाशा व्यवसायात हिंदू, मुस्लिम, आदिवासी मजूरही काम करतात. त्यात राम भिल, संजय भिल, गुरू भिल, दिलबर भिल, निसार पैलवान, मजीद करीम, साजिद मजीद, साबीर मजीद, आदींचा सामावेश आहे. ही मंडळी जातीय भेद न पाळता एकत्र काम करतात. अजीज यांच्या कुटुंबाने धार्मिक एकोपा जपला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com