Sugar Gathi Rate : गाठींचा गोडवा महागाईमुळे संकटात

Gudhi Padwa Festival : होळीचा सण तोंडावर आला असून बाजारात साखरमाळेची (गाठी) मागणी वाढली आहे.
Gathi Rate
Gathi Rate Agrowon

Nagpur News : होळीचा सण तोंडावर आला असून बाजारात साखरमाळेची (गाठी) मागणी वाढली आहे. साखरेसह इतर कच्चा माल आणि कामगारांच्या वेतनात वाढ झालेली आहे. परिणामी, गाठींचे भावही २० टक्क्यांनी वाढले आहेत.

शहरातील टिमकी, गोळीबार चौक, इतवारी आदी परिसरात गाठी तयार होतात. नागपुरातील गाठी विदर्भासह मध्यप्रदेशातील बाजारात विक्रीसाठी जातात. गेल्या काही वर्षांमध्ये गाठीविक्रीचा व्यवसाय ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाला आहे. इतवारी, हंसापुरी खदान, हुडकेश्वर, शांतिनगर येथून येणारे उत्पादन मजुरांअभावी कमी झाले आहे.

Gathi Rate
Sugar Commissioner : कुणाल खेमनार यांची साखर आयुक्तपदी नियुक्ती, राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या

त्याचा व्यवसायावर परिणाम होत आहे. यंदा ५० ग्रॅमपासून पाच किलोपर्यंतची गाठ उपलब्ध आहे. फॅन्सी गाठींची विक्री नगाप्रमाणे होते. त्याचा दर आठशे रुपयांपासून आहे, अशी माहिती गाठी उत्पादक आणि विक्रेता जगन्नाथ गुप्ता यांनी दिली.

Gathi Rate
Sugar Production : सातारा जिल्ह्यात दीड कोटी टन साखरेची निर्मिती

गुढीपाडव्याला गुढीला साखरेची माळ घातली जाते. खास करून विदर्भात होळीला गावखेड्यातील लोक एकमेकांच्या घरी लहान मुलांना गाठी व कडे देतात. गुढीपाडव्यापर्यंत गाठींना मागणी असते. या काळात लग्न ठरलेल्या व लग्न झालेल्या नववधूला गाठी, साडी-चोळी घेण्याची प्रथा आजही पाळली जाते.

होळीचा सण जवळ आल्याने गाठी उद्योगाला नव्या जोमाने सुरवात झाली आहे. गाठींचा किरकोळ विक्रीचा भाव १२० ते १४० रुपये किलो आहे. तर ठोक ७० ते ८० रुपये किलो आहे.

भाववाढ, मजुरांअभावी उद्योग अडचणीत

‘‘साखरेसह इंधन, साखर पावडर, दोरा, दूध या कच्च्या मालाच्या भावात वाढ झाली आहे. मजुरीचा प्रश्‍न गंभीर आहे. वाढीव दर देऊनही मजूर मिळत नाहीत, यामुळे हा उद्योग अडचणीत आहे. आम्ही हा पारंपरिक उद्योग टिकवून ठेवला आहे,’’ असेही गुप्ता म्हणाले.

होळीला पुरण पोळी, रंग, गुलाल, पिचकारी याचे जसे महत्त्व आहे, तसाच गाठीलाही मान आहे. ज्यांच्याकडे लहान मुले आहेत, तिथे खाऊ म्हणून होळीला गाठी पाठवतात. शिवाय, वाग्दत्त वधूला मान म्हणून गाठीचोळी पाठवतात असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com