Sugar Market Rate : बांगलादेशात साखर महागली

Sugar Industry : भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून साखरेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
Sugar
Sugar Agrowon

Sugar Market Update : भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून साखरेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पॅकबंद साखर बाजारात फारशी दिसत नसून सुटी साखर महागली आहे. सध्या येथील बाजारात पॅकबंद साखरेचा एका किलोचा दर भारतीय चलनात १२५ रुपये असून सुटी साखर १२० रुपये किलोने मिळत आहे.

बांगलादेशात किरकोळ बाजारातील साखरेचा दर सरकार निश्‍चित करते. सध्या सरकारने ठरविलेला दर व्यापाऱ्यांसाठी तोट्याचा ठरण्याची शक्यता असल्याने ‘बांगलादेश शुगर रिफायनर्स असोसिएशन’ने साखरेचे दर एका किलोमागे २० ते २५ टकाने (बांगलादेशी चलन) वाढविले आहेत.

Sugar
Sugar Market : एप्रिलच्‍या तुलनेत मे मध्ये साखरेच्‍या मागणीत घट

या संघटनेने देशातील व्यापार आणि शुल्क आयोगाला पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे, की आंतरराष्ट्रीय बाजारात किमती वाढत असल्याने सरकारी दराने साखरविक्री करण्यात कंपन्यांना तोटा होत आहे. यामुळे त्यांनी किमती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापाऱ्यांनी २२ जूनपासून नवे दर लागू करण्यास सुरुवात केली आहे.

भारतातून निर्यात बंद

बांगलादेशात साखरेची वार्षिक मागणी १.८ ते २ कोटी टन आहे. देशात साखरेचे सुमारे एक लाख टन उत्पादन होते. साखरेची मागणी भागविण्यासाठी भारत, ब्राझील आणि अर्जेंटिनातून आयात केली जाते. बांगलादेशात साखरेची किंमत गेल्या वर्षभरापासून दुपटीने वाढली आहे. जून २०२२मध्ये साखरेचे दर ८० ते ८४ रुपये प्रतिकिलो होते. साखरेच्या निर्यातीत ब्राझील प्रथम क्रमांकावर आहे तर दुसऱ्या स्थानी भारत आहे.

Sugar
Sugar Market : पावसाचे आगमन लांबल्याने साखरेच्या मागणीत काहीशी वाढ

गेल्या वर्षी भारत सरकारने साखरेच्या निर्यातीवरील बंदी आणखी वाढविली होती. बंदीची मुदत आधी ३१ ऑक्टोबर २०२२पर्यंत होती. त्याला ३१ ऑक्टोबर २०२३पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. २०२०-२१ च्या आकडेवारीनुसार इंडोनेशिया भारताकडून सर्वाधिक साखर खरेदी केली जाते. त्यानंतर बांगलादेश, सौदी अरेबिया, इराक व मलेशियाचा क्रमांक लागतो.

दरवाढीची कारणे (बांगलादेश शुगर रिफायनर्स असोसिएशननुसार)

- आयातीत घट आणि आयात शुल्कात वाढ

- आयात शुल्क प्रति टन २२ हजारांवरून ३२ हजार टका केले

- आयात ते किरकोळ बाजारापर्यंत साखरेवर ४२ टका प्रतिकिलोपर्यंत शुल्क द्यावे लागते

- आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढलेले आहेत

- डॉलरच्या मूल्यवाढीबरोबरच आयातीवरील खर्चात वाढ

- डॉलरच्या संकटामुळे ‘लाइन ऑफ क्रेडिट’साठी बँकेचा नकार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com