Green Chilies Rate : नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट : दर स्थिर

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात हिरवी मिरचीची आवक ७८७ क्विंटल झाली.
Green Chilies Rate
Green Chilies RateAgrowon

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार (Nashik APMC) समितीत गत सप्ताहात हिरवी मिरचीची आवक ७८७ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २,५०० ते ४,००० रुपये तर सरासरी दर ३,३०० रुपये मिळाला. आवकेत घट झाली असून दर स्थिर असल्याचे दिसून आले.

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ उतार झाल्याचे पाहायला मिळाले. वालपापडी-घेवड्याची आवक ६,२७३ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ३,००० ते ४,५०० असा तर सरासरी दर ३,३०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल २,५०० ते ३,५०० तर सरासरी दर ३,००० रुपये राहिला. गाजराची आवक १,२६४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४,२०० ते ७,५०० तर सरासरी दर ६,००० रुपये राहिला.

Green Chilies Rate
Cotton Market : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड सुरू

उन्हाळ कांद्याची आवक ६,८७७ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४४० ते २,४०० तर सरासरी दर १,६०० रुपये राहिला. लसणाची आवक ५० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,९०० ते ७,१०० तर सरासरी दर ५,७०० रुपये राहिला. बटाट्याची आवक ७,०३० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १,६५० ते २,२०० तर सरासरी दर २,१५० रुपये राहिला. आद्रकची आवक ६८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५,००० ते ६,१०० तर सरासरी दर ५,५०० रुपये राहिला.

फळभाज्यामध्ये टोमॅटोला ७० ते ६२५ तर सरासरी ४००, वांगी ६०० ते ९०० तर सरासरी ७५०, फ्लॉवर १०० ते ४०० सरासरी २५० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला १२० ते २०० तर सरासरी १८० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले. ढोबळी मिरचीला ६०० ते ८०० तर सरासरी दर ७०० रुपये असे दर प्रति ९ किलोस मिळाले.

वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा २५० ते ४०० तर सरासरी ३२५,गिलके ३०० ते ४५० तर सरासरी २२५, दोडका ३०० ते ५०० तर सरासरी दर ४०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. फळांमध्ये केळीची आवक १,५५३ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८०० ते १,६०० तर सरासरी दर १,४०० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक १,८११ क्विंटल झाली. मृदुला वाणास ५०० ते ११,००० तर सरासरी ८,००० रुपये दर मिळाला.

भाजीपाला प्रती १०० जुड्यांचा दर

पालेभाजी...किमान...कमाल...सरासरी

कोथिंबीर...४,०००...१७,०००...१२,०००

मेथी...२,०००...४,०००...३,३००

शेपू...२,१००...४,१००..३,०००

कांदापात...३,०००...६,५००...५,०००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com