Cotton, Soybean Production: देशात सोयाबीन उत्पादन उच्चांकावर; कापूस उत्पादन घसरणीत

India Farming: यंदा देशात सोयाबीन उत्पादन विक्रमी १५१ लाख टनांवर पोचले असून, गहू, मका आणि भात उत्पादनही वाढले आहे. मात्र, कापूस उत्पादनात घट होऊन ते २९४ लाख गाठींपर्यंत खाली आले आहे, असे केंद्र सरकारच्या दुसऱ्या सुधारित अंदाजात स्पष्ट झाले आहे.
Soybean and Cotton
Soybean and CottonAgrowon
Published on
Updated on

Pune News: देशात यंदा सोयाबीनचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोचून १५१ लाख टन झाले, तर कापूस उत्पादनात मोठी घट होऊन २९४ लाख गाठींपर्यंत कमी झाले. तसेच  भात, गहू, मका, भुईमूगाचे उत्पादनही विक्रमी पातळीवर पोचले आहे. गव्हाचे उत्पादनही विक्रमी १ हजार १५४ लाख टन होईल, तसेच तूर उत्पादन ३५ लाख टन आणि हरभरा उत्पादन ११५ लाख टनांवर होण्याची शक्यता आहे, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला. 

Soybean and Cotton
Soybean Cotton Farmer : शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण; सोयाबीन, कापूस, कांदा आणि तूर दरावरून दानवे यांची सरकारवर टिका

केंद्र सरकारने सोमवारी (ता.१०) देशातील २०२४-२५ वर्षातील शेतीमाल उत्पादनाचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला. या अंदाजात देशातील भात, गहू, मका, भुईमूग आणि सोयाबीनचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्याचे म्हटले आहे. खरिप हंगामात देशात १ हजार ६६३ लाख टन अन्नधान्य उत्पादन झाले, तर रब्बी हंगामात १ हजार ६४५ लाख टन उत्पादन झाल्याचा अंदाज आहे. भाताचे खरिपातील उत्पादन विक्रमी पातळीवर पोचले असून १ हजार २०६ लाख टनांवर पोचले. रब्बीतील भात उत्पादनही १५७ लाख टन झाले, असा अंदाज आहे. गव्हाचे उत्पादनही विक्रमी १ हजार १५४ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला. गेल्या हंगामात १ हजार १३२ लाख टन होते.

खरिपातील मका उत्पादनही विक्रमी पातळीवर पोचले असून २४८ लाख टन उत्पादन झाले, तर रब्बीतील उत्पादन १२४ लाख टन असेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला. श्रीअन्न म्हणजेच भरडधान्याचे उत्पादन खरिपात १३७ लाख टन आणि रब्बीत जवळपास ३१ लाख टन झाले. मसूरचे उत्पादनही १८ लाख टनांवर पोचल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला. खरिपातील भुईमूग उत्पादन विक्रमी पातळीवर पोचले असून १०४ लाख टनांचा अंदाज आहे. तर रब्बीतील उत्पादन जवळपास ९ लाख लाख टन होईल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला.  

Soybean and Cotton
Cotton Procurement: राज्यातील १२४ केंद्रांवर १.४ कोटी क्विंटल कापूस खरेदी!

तूर, हरभरा उत्पादन 

देशातील तूर उत्पानाच्या अंदाजात मोठी वाढ करण्यात आली नाही. दुसऱ्या अंदाजातही देशातील तूर उत्पादन ३५ लाख टन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर हरभरा उत्पादन ११५ लाख टन होईल, असेही सरकारने म्हटले आहे. 

सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळीवर

देशातील सोयाबीन उत्पादन यंदा विक्रमी पातळीवर पोचल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला. देशात मागील हंगामात १३० लाख टन सोयाबीन उत्पादन झाल्याचा अंदाज सरकारने दिला होता. मात्र यंदा उत्पादन वाढून १५१ लाख टनांवर पोचल्याचे सरकारने म्हटले आहे. 

कापूस उत्पादनात घट

सरकारने यंदा कापूस उत्पादनात घट झाल्याचे म्हटले आहे. गेल्या हंगामात देशात ३२५ लाख टन कापूस उत्पादन झाले होते. तर पहिल्या अंदाजात सरकारने २९९ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज दिला होता. आता सुधारित अंदाजात कापूस उत्पादन २९४ लाख टनांवर स्थिरावेल, असे म्हटले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com