Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा

Soybean Market : सोलापूरसह राज्यात यंदाच्या हंगामात सोयाबीनचे चांगले उत्पादन होऊनही हमीभावाने कमी खरेदी झाल्यामुळे शेतकऱ्यांची ओरड वाढली होती.
Soybean Market
Soybean ProcurementAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूरसह राज्यात यंदाच्या हंगामात सोयाबीनचे चांगले उत्पादन होऊनही हमीभावाने कमी खरेदी झाल्यामुळे शेतकऱ्यांची ओरड वाढली होती. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १ हजार ८६९ शेतकऱ्यांचे ३० हजार ८९० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

यंदा जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ५३३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४७ हजार ६६ हेक्टर आहे. सरासरीच्या तुलनेत २९४.३३ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. मात्र, सोलापूरसह राज्यात सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात असताना ''नाफेड''कडून हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले.

Soybean Market
Soybean Procurement : आधारभूत किमतीने सोयाबीन खरेदीला गती

विलंबाने सुरू झालेली खरेदी, १२ टक्के ओलाव्याची अट, सततच्या पावसामुळे सोयाबीनमध्ये असलेला ओलावा, बारदान्याच्या अनुपलब्धतेमुळे खोळंबलेली खरेदी यामुळे खरेदी केंद्रांवर सोयाबीनची खरेदी कमी झाली.

दरम्यान, केंद्र सरकारने १५ टक्के ओलावा गृहीत धरून सोयाबीन खरेदी करण्याचे आदेश दिले. मात्र, खरेदीसाठी १२ जानेवारीपर्यंतची मुदत होती. उन्हामुळे ओलावा घटल्याने बाजारात सोयाबीनची आवक वाढत असताना केंद्र बंद होणार असल्याने शेतकऱ्यांतून ओरड सुरू झाली. परिणामी केंद्राने सोयाबीन खरेदीसाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे.

Soybean Market
Soybean Procurement : देशात आतापर्यंत १४ लाख टन सोयाबीन खरेदी

शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल एक हजाराचा फटका

केंद्र सरकारने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सोलापूर बाजार समितीत गुरुवारी (ता. १६) १०४ क्विंटल सोयाबीनची आवक होती. प्रतिक्विंटल ३ हजार ९०० ते ४ हजार १७० रुपये दर मिळाला.

सरासरी ४ हजार रुपयाने सोयाबीनची विक्री झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना साधारणः १ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. खरेदी केंद्रांवरील अटी व बाजारातील पडलेले दर यामुळे सध्या सोयाबीन विकण्याकडे कल नसल्याचे दिसत आहे.

सोयाबीन खरेदीची स्थिती

शेतकरी नोंदणी ४,५८७

संदेश पाठवलेल्या शेतकऱ्यांची संख्या २,८३४

सोयाबीन खरेदी झालेले शेतकरी १,८६९

खरेदी झालेली सोयाबीन (क्विंटलमध्ये) ३०,८९०

सोयाबीन खरेदीची रक्कम १५,११,१३,८८

राज्यात अन्यत्र बारदान्याची अडचण निर्माण झाली असली तरी सोलापुरात पुरेशा प्रमाणात बारदाना उपलब्ध होता. त्यामुळे खरेदीला कोणतीही अडचण आली नाही. ३० हजार ८९० क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे. आता ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदीसाठी नोंदणी करावी.
- हरिदास भोसले, पणन अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com