
Amravati News: विदर्भातील कापसानंतर दुसरे मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचे दर नाफेडने खरेदी बंद करताच हमीदराच्या अतिशय नीचांकी पातळीवर आले आहेत. गेल्या आठ वर्षांतील ही सर्वाधिक पडझड असल्याचे खरेदीदारांनी म्हटले आहे. खासगी बाजारात सध्या चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला ३९०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहेत. वर्ष २०१६-१७ च्या हंगामात खुल्या बाजारात हा दर चार हजार रुपयांवर होता.
बाजारात दर पडत असल्याने तत्कालीन राज्य सरकारने शेतकऱ्यांचा रोष विधानसभा निवडणुकीत उफाळून येऊ नये, यासाठी शासकीय खरेदीची घोषणा केली होती. ही खरेदी नाफेडच्या माध्यमातून करण्यात आली. नाफेडने १५ ऑक्टोबर २०२४ पासून सोयाबीनची ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल या हमीदाराने शासकीय खरेदी केली आहे. त्यासाठी राज्याला १४ लाख १३ हजार २७० टन इतके उद्दिष्ट देण्यात आले होते.
सहा फेब्रुवारीपर्यंत चाललेल्या या शासकीय खरेदीत उच्च प्रतीचा ८ लाख ३६ हजार ७४१ टन सोयाबीन ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आला. निर्धारित उद्दिष्टांच्या तुलनेत हे प्रमाण सरासरी ५९ टक्के आहे. नाफेडला खरेदीसाठी मुदतवाढ दिल्यानंतरही उद्दिष्टाइतके सोयाबीन खरेदी होऊ शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी बाजाराशिवाय पर्याय राहिला नाही.
५ फेब्रुवारी २०२५ ला शासकीय खरेदी संपल्यानंतर खासगी बाजारात सोयाबीनचे दर कोसळले. चांगल्या व उच्च प्रतीच्या सोयाबीनलाही सध्या ३,९०० ते ४ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. तर त्यापेक्षा कमी प्रतीच्या सोयाबीनला ३५०० ते ३६०० रुपये दर आहे. गेल्या आठ वर्षांतील सोयाबीनच्या दरातील ही सर्वांत नीचांकी घसरण आहे. आठ वर्षांपूर्वी वर्ष २०२६-१७ मध्ये सोयाबीनला दोन हजार ७७५ रुपये हमीदर होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.