फ्यूचर्स किमती : २ ते ८ नोव्हेंबर २०२४
Agriculture Market : २ नोव्हेंबरपासून NCDEX मध्ये कपाशीसाठी पुढील वर्षाच्या नोव्हेंबर (२०२५) डिलिव्हरी व मक्यासाठी मार्च डिलिव्हरी व्यवहार सुरू झाले. तसेच MCX मध्ये कापसासाठी मे डिलिव्हरी व्यवहार सुरू झाले. या महिन्यात त्यामुळे NCDEX मध्ये कपाशीसाठी नोव्हेंबर (२०२४), फेब्रुवारी, एप्रिल व नोव्हेंबर (२०२५) डिलिव्हरी, मक्यासाठी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च डिलिव्हरी तर हळदीसाठी डिसेंबर, एप्रिल व मे डिलिव्हरी व्यवहार सुरू आहेत. MCX मध्ये कापसासाठी नोव्हेंबर, जानेवारी, मार्च व मे डिलिव्हरी व्यवहार सुरू आहेत.
कापूस, मका, मूग व सोयाबीन यांची आवक गेल्या सप्ताहात दिवाळीमुळे घसरली होती. आता ती पुन्हा वाढत्या प्रमाणात सुरू आहे. सोयाबीनच्या किमती अजूनही हमीभावापेक्षा जवळ जवळ रु. ४०० ने कमी आहेत. जागतिक किमती नजीकच्या भविष्यात वाढण्याची शक्यता फार कमी आहे. भारतातील उत्पादनसुद्धा या वर्षी वाढलेले आहे. शासनातर्फे हमीभावाने खरेदी करण्याचे प्रमाण वाढण्याची जरूरी आहे.
८ नोव्हेंबर २०२४ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात रु. ५६,२०० वर आले होते. या सप्ताहात ते घसरून रु. ५५,१६० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स भाव रु. ५६,९२० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ७ टक्क्यानी अधिक आहेत. कापसाची आवक वाढती आहे.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात रु. १,४९० वर आले आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स रु. १५२३ वर आले आहेत, तर एप्रिल फ्यूचर्स रु. १५६६ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.१ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७५२१ आहेत.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात रु. २३७५ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. २४२० वर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्यूचर्स रु. २४५० वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव ३.२ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २२२५) अधिक आहेत.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात रु. १३,७७५ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. १३,१४६ वर आल्या आहेत. एप्रिल किमती रु. १३,८८० वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.८ टक्क्याने अधिक आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ६९५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५६५० आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७,७५० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८६८२ आहे. किमती कमी होत आहेत.
सोयाबीन
या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ४४८२ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४८९२ आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.
तूर
तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ९,६५५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७५५० आहे. नवीन पिकाची आवक जानेवारी अखेर सुरू होईल.
कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत या सप्ताहात वाढून रु. ५४१० वर आली आहे. नवीन पिकाची आवक सुरू झाली आहे.
टोमॅटो
या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) घसरून रु. २००० वर आली आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.