Onion Import Duty : बांगलादेशकडून कांदा आयात शुल्क शून्यावर

Onion Update : आता कांद्याची उपलब्धता कमी असल्याने व दर नियंत्रणासाठी बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाने कांद्याच्या आयातीवरील शुल्क हटवले आहे.
Onion
OnionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : बांगलादेश हा भारतीय कांद्याचा प्रमुख आयातदार देश आहे. मात्र बांगलादेशातील उत्पादित कांद्याची देशांतर्गतच निकासी व्हावी व कांदा आयातीला निर्बंध यावेत, यासाठी बांगलादेश सरकारने हा निर्णय घेतला होता. मात्र आता कांद्याची उपलब्धता कमी असल्याने व दर नियंत्रणासाठी बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाने कांद्याच्या आयातीवरील शुल्क हटवले आहे. १५ जानेवारीपर्यंत हा निर्णय कायम असणार आहे.

बांगलादेशकडून मागील काही महिन्यांपासून आयात शुल्क लागू करण्यात आले होते. परिणामी भारतीय कांद्याला अपेक्षित परतावा मिळत नव्हता. केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात किमान निर्यात मूल्य रद्द करून निर्यात शुल्क २० टक्के कमी केले होते. मात्र बांगलादेशमध्ये आयात शुल्क असल्याने त्याचा फटका बसत होता.

Onion
Onion Export Policy : कांदा उत्पादकांच्या भावना जाणून निर्यात धोरणात बदल

आता बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाने (NBR) कांद्याच्या आयातीवरील सीमाशुल्क आणि नियामक शुल्क पूर्णपणे मागे घेतले आहे. बांगलादेशच्या राष्ट्रीय महसूल मंडळाचे अध्यक्ष महम्मद अब्दूल रहमान खान यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार १५ जानेवारी २०२५ पर्यंत हे आयात शुल्क मागे घेण्यात आले आहे.

Onion
Manchar Onion Market : मंचरला जुन्या कांद्याला मिळाला प्रतिकिलोला ७० रुपये उच्चांकी दर

बांगलादेश सरकारच्या व्यापार व शुल्क आयोगाने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्याच्या पाच टक्के सीमाशुल्क पूर्णपणे मागे घेण्याचा प्रस्ताव ३१ ऑक्टोबर रोजी दिला होता. त्यासंदर्भात हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता भारतातून कांद्याची निर्यात काय अंशी वाढण्याची शक्यता आहे.

सध्या भारतीय बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून दरात टप्प्याटप्प्याने सुधारणा दिसून आली. आता निर्यात प्रक्रियेत देशांतर्गत व निर्यातीचे दर यातील व्यवहार जुळणार नसल्याची स्थिती असल्याचे कांदा निर्यातदार मनोज जैन यांनी सांगितले. जर आगामी काळात हा निर्णय कायम राहिल्यास कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांना फायदा होईल. त्यामुळे बांगलादेशमध्ये होणारा कांद्याचा पुरवठा थोड्याफार प्रमाणात वाढू शकतो असे बोलले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com