Cotton Soybean Market : कापूस, सोयाबीन वगळता सर्व पिकांमध्ये दरवाढ

Turmeric Market Rate : हळदीच्या निर्यात मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या हळदीत तेजी आहे. हळदीच्या स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे.
Cotton Soybean
Cotton SoybeanAgrowon

फ्यूचर्स किमती ः सप्ताह- ८ ते १५ जुलै २०२३

Agriculture Commodity Market : या वर्षी उशिरा पाऊस सुरू झाल्यामुळे देशातील खरीप पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. चालू वर्षी हळदीचे उत्पादन कमी झालेले आहे; पुढील वर्षीसुद्धा ते कमी असेल असा अंदाज आहे. हळदीच्या निर्यात मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या हळदीत तेजी आहे. हळदीच्या स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे. त्यामुळे फ्यूचर्स मार्केटमध्ये विकणे अजूनही किफायतशीर आहे.

मक्याची मागणी वाढती आहे. कमी उत्पादनाच्या भीतीमुळे किमती वाढत आहेत. हरभरा, सोयाबीन, तूर यांच्या किमतीसुद्धा वाढत आहेत; अर्थात त्यातील काही वाढ हंगामी आहे. चालू वर्षी देशातील तुरीचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा २० टक्क्यांनी कमी झाले. त्यामुळे किमती वाढत आहेत. तुरीच्या उत्पादनावर व किमतीवर चालू खरिपात विशेष लक्ष ठेवणे जरूर आहे.

या सप्ताहात कापूस व सोयाबीन वगळता सर्वच पिकांच्या किमती वाढल्या. या वर्षी (जून – जुलै महिन्यांत) मुगाची आवक गेल्या वर्षीपेक्षा कमी झाली आहे. कांदा व टोमॅटोची आवक कमी होत आहे. मक्याचे भाव वाढत आहेत.

१४ जुलै रोजी संपलेल्या सप्ताहातील किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.५ टक्क्याने वाढून रु. ५५,९६० वर आले होते. या सप्ताहात ते ०.३ टक्क्याने घसरून रु. ५५,८०० वर आले आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स भाव रु. ५६,७४० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. ५६,७०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा १.६ टक्क्याने अधिक आहेत. कापसाचे भाव घसरण्याचा कल आहे. आवकपण आता कमी होत आहे.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,४०१ वर आले होते. या सप्ताहात ते रु. १,३९४ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४८० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ६.२ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.

Cotton Soybean
Maize Cultivation : मका लागवडीसाठी कोणते वाण निवडावेत?

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात ०.५ टक्क्याने वाढून रु. १,९५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्याने वाढून रु. १,९८० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (ऑगस्ट डिलिव्हरी) किमती रु. १,९९४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. २,०१८ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.९ टक्क्याने अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात ५.२ टक्क्यांनी वाढून रु. ९,०५६ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा १५.९ टक्क्यांनी वाढून रु. १०,४९९ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमतीसुद्धा २१.६ टक्क्यांनी वाढून रु. ११,८४२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. १२,४६० वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १८.७ टक्क्यांनी जास्त आहेत. डिसेंबर भावसुद्धा (रु. १२,८१८) चांगला आहे. ही वाढ निश्‍चित सट्टेबाजीमुळे निर्माण झालेली आहे; मात्र फ्यूचर्स विक्रीसाठी त्याचा फायदा करून घेता येईल.

Cotton Soybean
Tur Market : अकोल्यात तुरीच्या दराची १० हजारांकडे झेप

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात रु. ५,१५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १ टक्क्याने वाढून रु. ५,२०० वर आल्या आहेत. चालू हंगामासाठी हमीभाव रु. ५,३३५ आहे. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात ०.७ टक्क्याने वाढून रु. ७,४५० वर आली होती. या सप्ताहात ती ०.७ टक्क्याने वाढून रु. ७,५०० वर आली आहे. मुगाची आवक गेल्या सहा आठवड्यांत वाढू लागली आहे. गेल्या वर्षी ती जुलैमध्ये सर्वाधिक होती. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती घसरत आहेत. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) रु. ५,२०२ वर आली होती. या सप्ताहात ती २.९ टक्क्यांनी घसरून रु. ५,०५० वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात ०.७ टक्क्याने वाढून रु. ९,३६७ वर आली होती. या सप्ताहात ती २.१ टक्क्यांनी वाढून रु. ९,५६० वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीच्या भावात तेजी आहे. आवक कमी आहे. पुढील वर्षाचे उत्पादन अनिश्‍चित आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com