Soybean Rate : सोयाबीन बाजारावरील दबाव अद्यापही कायम

Soybean Market Update : बाजारातील सोयाबीनची आवक आणि उद्योगांची सावध खरेदी यामुळे सोयाबीन बाजारातील निराशेचे वातावरण कायम आहे.
Soybean
Soybean Agrowon

Pune News : यंदा दुष्काळ, घटलेलं उत्पादन ही संकट असतानाही वाढलेलं जागतिक उत्पादन आणि सरकारचं धोरण यामुळं सोयाबीन भाव दबावातच आहेत. त्यातच बाजारातील सोयाबीनची आवक आणि उद्योगांची सावध खरेदी यामुळे सोयाबीन बाजारातील निराशेचे वातावरण कायम आहे.

आता ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीनची काढणी वेगाने सुरु आहे. ब्राझीलच्या उत्पादनात सतत घट दाखवली जात आहे. पण सोयाबीन बाजाराचं लक्ष युएसडीएच्या मार्चच्या अहवालाकडे आहे. तर देशातील बाजारात पुढच्या काही आठवड्यांमध्ये १०० ते २०० रुपयांचे चढ उतार येऊ शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

आता सोयाबीनचे भाव सोयापेंड आणि सोयातेलावर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही मालाचे भाव पडलेले आहेत. या काळात केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे. पण सरकारचे धोरण भाव आणखी कमी होण्यालाच कारणीभूत आहेत.

देशातील सोयाबीन बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजाराचा दबाव तर आहेच. शिवाय सरकारने आयात शुल्क कमी करून आयातीचा लोंढा देशात आणला त्याचाही दबाव वाढला. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल स्वस्त आहे. विशेष म्हणजे सध्या सोयातेलाची आवक चांगलीच वाढत आहे. कारण पामतेलाचे भाव काहीसे वाढल्यानंतर सोयातेलाची आवक सुरु झाली. परिणाम देशातील सोयाबीन गाळपातून मिळणाऱ्या तेलाचेही भाव कमी झाले. 

Soybean
Soybean Market : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर

देशातील बाजारात सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. ही भावपातळी मागील जवळपास दोन महिन्यांपासून कायम आहे. सरकार खाद्यतेल बाजारावर दबाव ठेऊन आहे. पुढील काळातही सरकार आयात वाढवेल, आंतरराष्ट्रीय बाजारात पुरवठा वाढल्याने सोयापेंडच्या भावात मोठ्या वाढीची अपेक्षा नाही.

त्यामुळे सोयाबीनच्या भावात जास्त परतावा मिळणार नाही, असे मानून यंदा देशातही सोयाबीन खरेदीत स्टाॅकीस्ट उतरले नाही. नफा दिसत नाही म्हटल्यावर स्टाॅकीस्ट सोयाबीनपासून दूर गेले. यामुळे प्रक्रिया उद्योग हाच ग्राहक उरला. उद्योगही गरजेप्रमाणे खरेदी करताना दिसत आहेत. 

Soybean
Soybean Rate : सोयाबीन भाव तीन वर्षातील निचांकी पातळीवर; सोयाबीन बाजारात स्टाॅकिस्ट सक्रीय का नाहीत ?

युएसडीएच्या अहवालाकडे लक्ष का?

ब्राझीलची सोयाबीन काढणी जोमात सुरु आहे. अर्जेंटीनातील पिकाचीही काढणी सुरु झाली. ब्राझीलमध्ये आतापर्यंत ४८ टक्के सोयाबीनची काढणी पूर्ण झाली. काढणी सुरु झाल्याने जागतिक बाजाराचं लक्ष आता मार्च महिन्यात प्रसिध्द होणाऱ्या युएसडीएच्या अहवालाकडे आहे.

कारण काढणी सुरु झाल्याने दोन्ही देशांमध्ये उत्पादकता किती आली याचा अंदाज येईल. त्यामुळे उद्या जाहीर होणाऱ्या या अहवालात युएसडीए काय अंदाज देते यावरूनही बाजारात चढ उतार दिसू शकतात. यामुळे सगळेजण या अहवालाची वाट पाहत आहेत. 

आवक आणि दराचा अंदाज

देशात यंदा उत्पादन कमी राहूनही भाव सरकारचा आधार मिळत नसल्याने दबावात आहेत. तर बाजारात यंदाचा माल आणि मागील हंगामातील शिल्लक माल असा बाजारात येत आहे. त्यामुळे सतत बाजारातली आवक ही दीड लाख क्विंटलच्या दरम्यान राहत आहेत. या आवकेचाही दबाव देशातील सोयाबीन बाजारावर दिसून येत आहे.

कारण उत्पादन घटलं तरी बाजारातील आवक आणि पुढे मागणी या दोन मुख्य घटकांचा दबाव कायम आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे सोयाबीन बाजारात १०० ते २०० रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात. तर मे महिन्यात काहीशी वाढ अपेक्षित आहे, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

जागतिक बाजारातील सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाचे भाव पडलेले आहेत. देशातही पुरेशे खाद्यतेल आयात होत आहे. याचाही दबाव सोयाबीन भावावर येत आहे. त्यामुळे पुढच्या महिना-दीड महिन्यात सोयाबीनमध्ये १०० ते २०० रुपयांचे चढ उतार राहण्याचा अंदाज आहे. 
सचिन अगरवाल, सोयाबीन प्रक्रियादार आणि निर्यातदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com