Agriculture Commodity Market : सोयाबीन, मका, हरभरा, हळदीच्या किमतीत घट

Soybean Rate : गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.३ टक्के घसरून रु. ४,२९३ वर आली होती.
Soybean Market Rate
Soybean MaizeAgrowon
Published on
Updated on

फ्युचर्स किमतीः सप्ताह- १८ ते २४ जानेवारी, २०२५

या सप्ताहात सर्वच प्रमुख पिकांची आवक कमी झाली. तूर व कांद्याखेरीज सर्व पिकांच्या किमती उतरल्या. तुरीच्या किमतीत ५.३ टक्क्यांनी वाढ होऊन त्या रु. ७,८४२ पर्यंत गेल्या. टोमॅटोच्या किमतीतील घसरण चालूच राहिली; मात्र कांद्याच्या किमती रु. २,००० वर गेल्या.

२४ जानेवारी रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.५ टक्क्यानी घसरून रु. ५३,५८० वर आले आहेत. मार्च फ्युचर्स भाव ०.३ टक्क्यानी घसरून रु. ५४,६२० वर आले आहेत. मे भाव रु. ५६,२०० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.९ टक्क्यानी अधिक आहेत.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात ०.६ टक्क्यानी घसरून रु. १,४२८ वर आले आहेत. फेब्रुवारी फ्युचर्स ०.७ टक्क्यांनी घसरून रु. १,४३० वर आले आहेत तर एप्रिल फ्युचर्स रु. १,४८५ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.६ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.

मका

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) गेल्या सप्ताहात १.५ टक्के घसरून रु. २,४५० वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या पुनः २ टक्के घसरून रु. २,४०० वर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्युचर्स किमती २.२ टक्के घसरून रु. २,४१३ वर आल्या आहेत. मार्च फ्युचर्स रु. २,४२६ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.१ टक्का अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.

Soybean Market Rate
Maize Farming : जळगाव जिल्ह्यात मका पिकाच्या क्षेत्रात मोठी वाढ

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात ०.५ टक्के घसरून रु. १३,७५६ वर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमतीसुद्धा १.७ टक्के घसरून रु. १३,७९० वर आल्या आहेत. मे किमती रु. १३,६५४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.७ टक्क्यांनी कमी आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात २.१ टक्के घसरून रु. ६,२६३ वर आल्या होत्या; या सप्ताहात त्या पुन्हा २.६ टक्क्यांनी घसरून रु. ६,१०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,१७५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे; मुगाचा हंगाम आता संपला आहे.

Soybean Market Rate
Soybean Procurement: नाफेडच्या संदेशाची ४ लाख सोयाबीन उत्पादकांना प्रतिक्षा; खरेदीला केवळ ५ दिवसांचीच मुदत 

सोयाबीन

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.३ टक्के घसरून रु. ४,२९३ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ०.९ टक्के घसरून रु. ४,२५५ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे.

तूर

गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) ०.७ टक्के वाढून रु. ७,४५० वर आली होती. या सप्ताहात ती ५.३ टक्के वाढून रु. ७,८४२ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक या सप्ताहात कमी झाली आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव बसवंत) किंमत या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने वाढून रु. २,०७५ वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) घसरून रु. १,००० वर आली होती; या सप्ताहात ती घसरून रु. ७५० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com