Agrowon Podcast : टोमॅटोमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, तूर तसेच काय आहेत हळदीचे दर ?

Market Update : आज आपण सोयाबीन, कापूस, गवार, टोमॅटो आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम आहेत. सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये आज नरमाई दिसून आली होती. सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत १२.४३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.

तर सोयापेंडचा भाव आजही ३८४ डाॅलर प्रतिटनांवर होता. देशातील बाजारात सोयाबीन  आजही ४ हजार १०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. खाद्यतेलाचे कमी झालेले भाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचा दबाव देशातही दिसून येत आहे. तसेच ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील कापसाचे वायदे आज काहीसे सुधारले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज ८० सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील वायदे कालच्या तुलनेत आज १०० रुपयांनी कमी होऊन ५७ हजार ८०० रुपये प्रतिखंडीवर होते.

तर बाजार समित्यांमधील कापसाचा भाव आजही ७ हजार १०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. कापूस बाजारावर सध्या वेगवेगळ्या घटकांचा दबाव असून ही परिस्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Agriculture Market
Agriculture Commodity Market : हळदीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज

बाजारात गवारची आवक कमीच असून दुसरीकडे गवारचा उठाव चांगला आहे. त्यामुळे गवारचे भाव टिकून आहेत. गवारच्या उन्हाळी लागडीसाठी अनेक भागात पाण्याची टंचाई होती. आजही पिकाला बहुतांसी ठिकाणी पाणी कमी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

त्याचा परिणाम गवारच्या बाजारातील आवकेवर होत आहे. त्यामुळे गवारचा भाव ४ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. गवारचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. 

Agriculture Market
Agrowon Podcast : कापूस वायदे नरमले; कापूस, सोयाबीन, तूर तसेच हळदीचे दर काय आहेत?

टोमॅटोच्या बाजारात मागील काही दिवसांपासून काहीशी सुधारणा दिसून आली. बाजारातील आवकेवर पूर्व मोसमी पाऊस आणि वाढत्या उन्हाचा परिणाम होत आहे. आवक काहीशी कमी झाली मात्र उठाव कायम असल्याने भावपातळी २०० ते ४०० रुपयांनी सुधारली आहे.

देशातील बाजारांमध्ये सरासरी दरपातळी १३०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान आहेत. टोमॅटो बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे दिसू शकते, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

मक्याचा बाजार मागील दोन महिन्यांपासून एका भावपातळीच्या दरम्यान दिसत आहे. देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे. पोल्ट्री, इथेनाॅल आणि स्टार्च उद्योगाकडून मका खरेदी केला जात आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. मक्याला २ हजार १०० ते २ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com