Agriculture Commodity Market : हळदीतील तेजी कायम राहण्याचा अंदाज

Market Update : या सप्ताहात हळदीच्या भावांनी उच्चांक गाठला. निजामाबादमध्ये हळदीचे भाव २४ मे रोजी सुमारे रु. १८,००० होते. हिंगोलीमध्ये ते रु. १५,५८०, तर सांगलीमध्ये ते (राजापुरी) रु. १८,३०० वर गेले होते.
Agriculture
Agriculture Agrowon

Agriculture Futures Value :

फ्यूचर्स किमती : सप्ताह १८ ते २४ मे २०२४

या सप्ताहात हळदीच्या भावांनी उच्चांक गाठला. निजामाबादमध्ये हळदीचे भाव २४ मे रोजी सुमारे रु. १८,००० होते. हिंगोलीमध्ये ते रु. १५,५८०, तर सांगलीमध्ये ते (राजापुरी) रु. १८,३०० वर गेले होते. गेल्या फेब्रुवारीपासून हळदीचे भाव सतत वाढत आहेत. या वर्षी उत्पादन कमी झाले; स्थानिक व निर्यात मागणी मात्र वाढती राहिली. भाव वाढत राहिले व साठासुद्धा वाढत राहिला. सध्या बाजारात तेजीचे वातावरण आहे. मे अखेरीस नवीन पिकाची लागवड सुरू होईल. हवामान व नवीन पिकाचे उत्पादन यावर पुढील किमती अवलंबून असतील. मात्र ऑगस्टपर्यंत तरी हे तेजीचे वातावरण कायम राहील असा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये माल विकायचा असेल तर हेजिंग करून कमीत कमी रु. २१,००० भाव सध्या मिळेल.

२४ मे रोजी संपलेल्या सप्ताहात मूग व सोयाबीन वगळता इतर पिकांच्या किमतीत वाढ झाली. सर्वाधिक वाढ हळदीत (३.९ टक्के) व हरभऱ्यात (३.१ टक्के) झाली. किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.९ टक्क्याने घसरून रु. ५६,९०० वर आले होते. या सप्ताहात ते ०.७ टक्क्याने वाढून रु. ५७,३२० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव ०.६ टक्क्याने वाढून रु. ५८,२८० वर आले आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स भाव रु. ६१,८०० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ७.८ टक्क्यांनी अधिक आहेत.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात रु. १,४६९ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४४० वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या सप्ताहात १.९ टक्क्याने वाढून रु. २,२०१ वर आल्या आहेत. फ्यूचर्स (जून) किमती १.७ टक्क्याने वाढून रु. २,२१३ वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स किमती रु. २,२२५ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.१ टक्क्याने अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत.

Agriculture
Agrowon Podcast : कांद्यात काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, तूर, तसेच हरभऱ्याचे काय आहेत दर ?

हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १७,३१४ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.९ टक्क्यानी वाढून रु. १७,७८९ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स किमती ११.७ टक्क्यांनी वाढून रु. १९,९७२ वर आल्या आहेत. ऑगस्ट किमतीनी रु. २०,००० ची पातळी ओलांडली आहे. त्या रु. २०,५९२ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १४.५ टक्क्यांनी जास्त आहेत.

हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ६.६ टक्क्यांनी वाढून रु. ६,४५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ३.१ टक्क्यांनी वाढून रु. ६,६५० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० जाहीर झाला आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे.

Agriculture
Wheat, Gram Market : कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव, गहू बाजार, हरभरा दर

मूग
मुगाची स्पॉट किमत (मेरटा) रु. ८,६०० वर आलेली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. आवक आता कमी होत आहे.

सोयाबीन
या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) ०.३ टक्क्याने घसरून रु. ४,६९७ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे. आवक कमी होत आहे.

तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. १०,७१७ वर आली होती. या सप्ताहात ती १.७ टक्क्याने वाढून रु. १०,९०० वर आली आहे. तुरीचा हमी भाव रु. ७,००० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे; मागणीमुळे नोव्हेंबर पासून भाव वाढत आहेत.

कांदा
कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. १,५८८ होती; या सप्ताहात ती रु. १,६७२ वर आली आहे. गेल्या सप्ताहात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ७५० वर आली होती. या सप्ताहात रु. १,०४२ वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com