Cotton Market : परभणी जिल्ह्यात भिजलेल्या कापसाचे दर सहा हजारांच्या खाली

Cotton Rate Update : कापसाची प्रत खालावली आहे. परिणामी दरात मोठी घसरण झाली आहे. भिजलेल्या कापसाची आवक होत आहे.
Cotton Market
Cotton Market Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : जिल्ह्यातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठा असलेल्या मानवत, सेलू, परभणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मॉन्सूनोत्तर पावसामध्ये भिजलेल्या कापसाचे दर सहा हजारांच्या खाली गेले आहेत.

शनिवारी (ता.१६) सेलू बाजार समितीत पावसामध्ये भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ५६०० ते कमाल ७००० रुपये दर मिळाले. तर न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७०५५ ते कमाल ७२३० रुपये, तर सरासरी ७१३० रुपये दर मिळाले.

जिल्ह्यात नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात जोरदार मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. त्यामुळे बोंडातून फुटलेला कापूस भिजला. धाग्यावर परिणाम झाला आहे. कापसाची प्रत खालावली आहे. परिणामी दरात मोठी घसरण झाली आहे. भिजलेल्या कापसाची आवक होत आहे.

Cotton Market
Cotton Picking : कापूस वेचणी का महागली?

बाजार समित्यांमध्ये न भिजलेला व भिजलेला अशी प्रतवारी करून कापसाची खरेदी केली जात आहे. शुक्रवारी (ता.१५) सेलू बाजार समितीत न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७३५० रुपये तर सरासरी ७२५० रुपये दर मिळाले. पावसात भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ६८९५ रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता.१४) भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ७००० रुपये, तर न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७०५० ते कमाल ७४०५ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता.१५) मानवत बाजार समितीत भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६४०० रुपये, तर न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७२२० रुपये तर सरासरी ७१७५ रुपये दर मिळाले.

Cotton Market
Cotton Market : कापूस, हरभरा, मूग, हळदीच्या किमतींत घट

गुरुवारी (ता.१४) भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६५०० रुपये तर न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७०५० ते कमाल ७२३० रुपये, तर सरासरी ७१७५ रुपये दर मिळाले. शनिवारी (ता.१६) परभणी बाजार समितीत कापसाची १४०० आवक होऊन प्रतिक्विटंल किमान ७०९५ ते कमाल ७१३५ रुपये तर सरासरी ७१०० रुपये दर मिळाले.

शुक्रवारी (ता.१५) १४५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७१३० रुपये तर सरासरी ७११० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१४) कापसाची १००० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल किमान ७२०० ते कमाल ७२६५ रुपये तर सरासरी ७२३५ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com