Cotton Rate : कापूस भावातील तेजी टिकून राहण्याचे संकेत

Cotton Market : मार्चमध्ये कापसाचा सरासरी भाव ८ हजारांच्या दरम्यान पोहोचू शकतो. तर मेपर्यंत पुन्हा ५ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Pune News : कापूस बाजारात सध्या तेजीचे वारे आहे. आंतरराषट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढल्याने भारताच्या कापसाला मागणी वाढली. यामुळे देशातील कापूस भावही गेल्या दोन आठवड्यांत १० टक्क्यांनी वाढले आहेत.

मार्चमध्ये कापसाचा सरासरी भाव ८ हजारांच्या दरम्यान पोहोचू शकतो. तर मेपर्यंत पुन्हा ५ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात कापसाच्या भावात चांगली वाढ झाली. सध्या सरासरी ७३०० ते ७५०० रुपयांच्या दरम्यान भावपातळी आहे. खेडा खरेदीतील भाव आजही ७ हजारांपासून सुरू होत आहेत. तर काही बाजारांमध्ये कमाल भाव ८ हजारांचाही मिळत आहे.

पण हा भाव काही बाजारांमध्ये आणि खूपच कमी मालाला मिळत आहे. जिनिंगचा कापूस खरेदीचा भाव वेगवगेळ्या भागात भाव ७६०० ते ८२०० रुपयांच्या दरम्यान आहे.

Cotton
Cotton Rate : राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा अधिक

फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत रुईला उठाव वाढत होता, पण सरकीला उठाव नव्हता. तसेच सरकीचे भाव २२०० ते २५०० रुपयांच्या दरम्यान होते. पण मागील दोन आठवड्यांपासून सरकीला देखील मागणी वाढली. परिणामी कापसाला आणखी आधार मिळाला. कापसाच्या भावात सुधारणा होण्यास रुईच्या मागणीत वाढीसह सरकीला उठाव मिळाल्यानेही मदत झाली.

सध्याचे सरकीचे भाव २७०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचले. म्हणजेच सरकीचे भाव क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढले आहेत. तर सरकी पेंडचे भावही क्विंटलमागे ३०० रुपयांनी वाढून २६०० ते २७०० रुपयांवर पोहोचले.

वेगवेगळ्या देशांमधील वायदे

वायदे बाजारांमध्ये देखील कापूस तेजीत आहे. अमेरिकेच्या वायदे बाजारात म्हणजेच इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंजवर (आयसीई) वायदे १०० सेंट प्रतिपाऊंडच्या आसपास आहेत. म्हणचे १८,३०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान. वायद्यांमध्ये रुईचा व्यवहार होतो. आपल्या सरकी असलेल्या कापसाचे व्यवहार होत नाहीत.

चीनच्या बाजारातही कापूस चांगलाच भाव खात आहे. चीनमध्ये कापूस १६ हजार ३८५ युआन प्रतिटनाने विकला जात आहे. रुपयात रुईचा भाव १८ हजार ८७५ रुपये होतो. तर देशातील एमसीएक्स कापूस ६२ हजारांवर आहे. म्हणजेच १७ हजार ४१५ रुपये प्रतिक्विंचल. म्हणजेच वायद्यांमध्ये देखील भारताचा कापूस स्वस्त आहे.

Cotton
Cotton Purchase Rate : परभणीत कापूस खरेदी दरात १००० ते १२०० रुपयांनी सुधारणा

प्रत्यक्ष खरेदीतील रुईचे भाव

कॉटलूक ए इंडेक्स - १०५.२५ (क्विंटल १९,२६० रुपये)

देशात - ६० हजार (क्विंटल १६,८५३ रुपये)

देशातील भाव ९२ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत

देशातील भाव २४०० रुपयांनी कमी

देशातील भाव अजूनही १२ टक्क्यांनी कमी

कापूस उत्पादन आणि आवक

सीसीआय उत्पादन अंदाज - २९४ लाख गाठी

बाजारातील आतापर्यंतची आवक २१५ लाख गाठी

शिल्लक कापूस ८० लाख गाठी

बाजारात ७५ टक्के कापूस आला

२५ टक्के कापूस बाजारात यायचा बाकी

सीसीआयची खरेदी ३२ लाख गाठी

भावाला नेमका कशाचा आधार

निर्यातीसाठी भारतीय कापसाला पसंती

बाजारातील कमी आवक

शेतकऱ्यांनी स्टॉक मागे ठेवला

मागणीमुळे जिनिंगकडून चांगली खरेदी

सरकीच्या भावातही काहीशी वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा कमी पुरवठा

पुढच्या काळात भाव का वाढतील?

शेतकरी आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडे कापसाचा स्टॉक २५ टक्क्यांपर्यंत राहीला.

अमेरिकेचा ८० टक्के कापूस विकला गेला. केवळ २० टक्के कापूस शिल्लक

चीन, बांगलादेश, व्हीएतनामची मागणी वाढली

देशातील कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा १२ टक्क्यांनी कमी

शेतकऱ्यांची विक्री कमी झाल्याने भाववाढीला आधार

देशातून कापूस, सूत आणि कापड निर्यात वाढली

सुतगिरण्या आणि कापड उद्योगांकडे कापसाचा स्टॉक कमी

मागणी पूर्ण करण्यासाठी कोणत्याही भावात खरेदी करावीच लागेल

देशात मागणीपेक्षा पुरवठा कमी

भाव कमी असल्याने आयातशुल्क काढले तरी आयात परवडत नाही

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com