
Akola News : पावसाने यंदाच्या खरीप हंगामात मूग, उडीद पिकांना मोठा फटका दिला. उशिरा पाऊस सुरु झाल्याने या पिकांचे लागवडीचे क्षेत्र घटले. त्यानंतर पावसात खंड पडल्याने आता उत्पादनावर परिणाम झाला.
बाजारात सध्या मुगाच्या दरांमध्ये तेजी दिसून येत असली तरी आवक मात्र फारच कमी होत आहे. मलकापूर बाजार समितीत शनिवारी (ता. ९) मुगाला कमाल दर १२१०० रुपये तर किमान ९५०० रुपये दर होता. सरासरी ११३०० रुपये दर होता.
विविध बाजार समित्यांमध्ये सध्या मुगाचे दर दर्जानुसार ठरत आहे. चांगल्या दर्जाचा माल ८५०० रुपयांवर मिळत आहे. खामगाव बाजार समितीत या महिन्यात मुगाला या हंगामात १२ हजारांपर्यंत सर्वाधिक दर मिळाला होता.
सप्टेंबरमध्ये बाजार समित्यांत मुगाची आवक सुरु होते. यंदा अकोला, खामगाव, मलकापूर अशा प्रमुख बाजार समित्यांचा आढावा घेतला असता अत्यंत कमी आवक होत आहे.
या महिन्यात आठवडाभरात मुगाच्या दरांनी उसळी घेतली आहे. खामगाव बाजारात मुगाला १ सप्टेंबरला कमाल दर साडेनऊ हजार रुपये मिळाला. ५ सप्टेंबरला हाच दर १२२०१ रुपयांपर्यंत पोचला.
शुक्रवारी (ता. ८) या ठिकाणी मूग किमान ४८०० ते कमाल ११८०० रुपयांनी विकला. वाशीम बाजार समितीत शुक्रवारी मूग ६००० ते ७२०० रुपयांदरम्यान विक्री झाला. १० क्विंटलची तेथे आवक झाली होती.
अकोला बाजार समितीत मुगाला सरासरी ७००० रुपयांचा दर मिळाला. किमान ५५०० ते कमाल ८५०० रुपयांपर्यंत हा दर होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.