Hapus Mango Market : शेतकऱ्यांकडून हापूस म्हणून कर्नाटकी आंब्यांची विक्री

Mango Market : यावर्षी हंगामाच्या सुरवातीपासूनच हवामान बदलाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले. यामुळे ऐन अक्षयतृतीयेच्या हंगामात आंब्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली.
Hapus Mango
Hapus MangoAgrowon

Pune News : यावर्षी हंगामाच्या सुरवातीपासूनच हवामान बदलाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले. यामुळे ऐन अक्षयतृतीयेच्या हंगामात आंब्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली. या टंचाईमध्ये कोकणातील शेतकऱ्यांनी चक्क कर्नाटकमध्ये जाऊन कर्नाटकी आंबा खरेदी केला.

तसेच त्याचा हापूस म्हणून पुरवठा पुणे, मुंबई आणि अहमदाबाद येथे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या प्रकरणी शेतकऱ्यांच्या नावाची बदनामी नको म्हणून प्रमुख आडतदारांनी याबाबत तक्रार केली नसल्याचे समोर आले आहे.

यंदा कोकणात ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील पावसाने हापूस आंब्यांचा मोहोर झडला. नंतर मोहोराच्या पोषक वातावरणासाठीची कडाक्याच्या थंडीची वाणवा, वाढलेले तापमान, फळधारणेच्या अवस्थेतील अवकाळी पाऊस आणि दुसऱ्या टप्प्यातील मोहोर न लागल्याने घटलेले उत्पादन आदी कारणांनी यंदा आंब्याची टंचाई निर्माण झाली.

Hapus Mango
Sharad Pawar Mango Variety : अन् शेतकऱ्यानं आंब्याला दिलं शरद पवारांच नाव

केवळ ३० ते ४० टक्केच उत्पादन मिळाल्याचे आंबा उत्पादकांनी सांगितले. यामुळे यंदा आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेलाच नाही.

दरम्यान, या आंबा टंचाईमध्ये कोकणातील काही शेतकऱ्यांनी थेट कर्नाटकमध्ये जाऊन कर्नाटकी आंबा खरेदी केला. कोकणातील हापूस नावाने पॅकिंग करून पुणे, मुंबई आणि अहमदाबाद बाजारपेठेत कर्नाटकी आंबा पाठविल्याचे प्रकार घडले आहेत.

याबाबत पुणे बाजार समितीमधील कोकण हापूसचे प्रमुख अडतदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली.

Hapus Mango
Mango Season : आंबा आवकेनंतरही केसर महागच

ते म्हणाले,‘‘ अक्षयतृतीयेला आंब्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली. या काळात कोकणातील एका शेतकऱ्याने ४०० पेट्या बाजारात पाठविल्या. हा शेतकरी स्वतःचा आंबा पाठवितो. त्यांच्याकडे पण आंबा टंचाई होती.

मात्र अचानक त्यांच्याकडून ४०० पेट्यांची आवक झाल्यावर आम्हाला शंका आली. यावर आम्ही आंबा तपासला. तो कर्नाटकचा म्हणून समोर आला. याबाबत शेतकऱ्यांची बदनामी नको म्हणून कुठेही वाच्यता केली नाही आणि तक्रार देखील केली नाही.’’

विश्वासार्हतेला तडा जाऊ नये’

असाच अनुभव मुंबई बाजार समितीमधील काही प्रमुख अडत्यांना आला. गुढीपाडवा आणि अक्षयतृतीयेच्या दरम्यान काही अडत्यांकडे कोकणचा हापूस म्हणून कर्नाटकी आंबा पाठविण्यात आला. याबाबत संबंधित शेतकऱ्यांना समज देऊन आलेला आंबा विक्री केला. मात्र ग्राहकांच्या आणि बाजारपेठेतील विश्वासार्हतेला तडा जाऊ नये, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले.

कोकण हापूसला आपण भौगोलिक निर्देशांक घेतलेला आहे. भविष्यात निर्यात आणि बाजारपेठेतील महत्त्व वाढीसाठी मोठ्या संधी असताना कोकणातील शेतकऱ्यांनी हापूस म्हणून कर्नाटकी आंबा विकणे निंदनीय आहे. असे प्रकार यावर्षी झाल्याची घटना कानावर आल्या आहेत. असे प्रकार शेतकऱ्यांनी टाळावेत. यामध्ये हापूस आणि शेतकरी बदनाम होता कामा नये.‘‘
- विवेक भिडे, अध्यक्ष, कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते संघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com