Tur Market : कळमनामध्ये तुरीच्या दरातील तेजी कायम

Tur Rate : अमरावती, अकोल्यानंतर आता नागपूरच्या कळमना बाजार समितीत देखील तुरीच्या दरात सुधारणा अनुभवण्यास येत आहे.
Tur Market
Tur MarketAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : अमरावती, अकोल्यानंतर आता नागपूरच्या कळमना बाजार समितीत देखील तुरीच्या दरात सुधारणा अनुभवण्यास येत आहे. आतापर्यंत दहा ते साडेदहा हजार रुपयांवर स्थिरावलेले तुरीचे दर आता थेट १२ हजार रुपयांवर पोचले आहेत. यापुढील काळात तुरीच्या दरात आणखी सुधारणा होण्याची शक्‍यता बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी वर्तविली.

कळमना बाजार समितीत मार्च महिन्याच्या सुरवातीला तुरीचे दर ९००० ते १०७११ याप्रमाणे होते. दर दहा हजार रुपयांवर पोचल्याने बाजारातील आवक देखील अडीच हजार क्‍विंटलपेक्षा अधिकची होती.

Tur Market
Tur Market : सोयाबीन, हरभऱ्यास नीचांकी दर; तुरीची झळाळी कायम

त्यानंतरच्या काळात दर स्थिर असल्याने आवक वाढती राहिली. तुरीची आवक चार हजार क्‍विंटलवर पोचली. त्यानंतर मात्र दर १०२०० आणि दहा हजार रुपयांपर्यंत खाली आले. त्यामुळे आवक कमी होत ६२६ क्विंटलवर आली.

Tur Market
Tur Market : तुरीचे दर साडेअकरा हजार पार

शेतकऱ्यांना तुरीच्या दरात सुधारणांची अपेक्षा होती. त्यामुळेच काही शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने तूर विकण्यावर भर दिला आहे. मार्च महिन्यात दहा ते साडेदहा हजार रुपयांवर असलेल्या तुरीच्या दरात आता चांगलीच तेजी आली आहे. सध्या तुरीचे १२ हजार रुपये आहे, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

उद्योजकांची वाढती मागणी

पाच एप्रिल रोजी ९५०० ते १२ हजार रुपये असा दर होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ९५०० ते ११२९२ रुपयांनी व्यवहार झाले. आता पुन्हा तुरीच्या दराने उसळी घेत ते ९५०० ते १२ हजार रुपयांवर पोचले आहेत. प्रक्रिया उद्योजकांची वाढती मागणी असल्याने दरात ही तेजी आल्याचे सांगितले जाते. तुरीच्या किरकोळ दरात देखील वाढ नोंदविण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com