Rice Market Rate
Rice Market Rate

Rice Rate : उत्पादन घटल्याने तांदूळ महागला

तांदळाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्याभरात तांदळाच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे.

नागपूर ः तांदळाचे भाव (Rice Rate) झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्याभरात तांदळाच्या दरात (Rice Market) प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे.

दक्षिण भारतात उत्पादन कमी झाल्याने मध्य भारतातील तांदळाची मागणी (Rice Demand) वाढलेली आहे. परिणामी, दर वाढू लागले आहेत. येत्या आठवड्यात पुन्हा तांदळाचे भाव वधारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Rice Market Rate
Wheat Rice Rate : देशात गहू, तांदळाचा साठा बफर स्टॉकपेक्षा अधिक

निर्यात हेच बाजारात तांदळाचे भाव वाढण्याचे कारण आहे. पण यासोबत आणखी काही घटकही कारणीभूत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा व्यापाऱ्यांकडे तांदळाचा साठा नाही. यासोबतच हवामानानेही धान उत्पादकांना साथ दिली नाही. पीक शेतात असताना अचानक वातावरण उष्ण झाले.

तसेच वेळेवर पाऊस झाला नाही. भात पीक तयार होत असतानाच पाऊस झाला. त्यामुळे उत्पन्नात सुमारे पाच टक्के घट झाली. सर्वसाधारण ग्राहकांकडूनही नवीन तांदळाची वार्षिक खरेदी केली जात आहे.

त्यामुळे मागणी अधिक आणि आवक कमी झाल्याने भावात सतत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात ४३ रुपये किलो असलेला तांदूळ आता ४८ रुपये, तर ४८ रुपये प्रति किलो असलेला तांदूळ ५३ रुपयांवर पोहोचला आहे.

Rice Market Rate
Rice Festival : ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाला सुरुवात

भात पेरणीचे क्षेत्र घटले

भात पेरणीचे क्षेत्र ५.५१ टक्क्यांनी घटून ४०१.५६ लाख हेक्टरवर आले होते. पीक वर्ष २०२२-२३ (जुलै-जून)च्या खरीप हंगामात ते ४२५ लाख हेक्टर होते. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या भाताच्या पेरणीखालील क्षेत्रावर नजर टाकली, तर झारखंडमध्ये ९.३२ लाख हेक्टर, मध्य प्रदेश ६.३२ लाख हेक्टर, पश्‍चिम बंगाल ३.६५५ लाख हेक्टर, उत्तर प्रदेश २.३२ लाख हेक्टर आहे.

बिहारमध्ये १.९७ लाख हेक्टरची तूट होती. याशिवाय आसाम, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, त्रिपुरा, मेघालय, ओडिशा, नागालँड, पंजाब, गोवा, मिझोराम, सिक्कीम आणि केरळमध्येही भाताखालील क्षेत्र घटले आहे.

तांदळासोबतच गव्हाचे नवीन पीक येण्यासाठी अद्याप तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात केल्याने त्याचा साठा कमी झालेला आहे. परिणामी, देशांतर्गत गव्हाची मागणी वाढल्याने दरात सतत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात गव्हाच्या दरात प्रति किलो दोन ते तीन रुपयांची वाढ झाली आहे.

- प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर किराणा व्यापारी संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com