
Nagpur News : नरखेड तालुक्यात तूर खरेदी करण्यासाठी नोंदणीला मुहूर्त केव्हा लागणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. आता नोंदणीचा मुहूर्त मिळाला असून नोंदणी करण्यास अखेर सुरुवात करण्यात आली आहे.
नाफेडकडून हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी नोंदणीला सुरुवात केली जाते. शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांना सर्व कागदपत्रांसह नोंदणी करणे आवश्यक असते. त्यानंतर कुठे त्यांची तूर घेतली जाते. शेतकऱ्यांनी आंतरपीक घेतलेल्या क्षेत्रातील पेरा क्षेत्र आणि उत्पादकतेचा तिढा अद्याप न सुटल्यामुळे ऑनलाइन तूर नोंदणीत अडचणी येत होत्या. नरखेड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी नोंदणी केंव्हा सुरू होणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. पण आता प्रत्यक्ष नोंदणीचा मुहूर्त सापडला असून नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.
नरखेड तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसामध्ये आंतरपीक म्हणून तुरीचे पीक घेतले जाते. परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापसाने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तुरीवर लक्ष केंद्रित करून खते, कीटकनाशके यांची फवारणी करून पाणी दिल्याने तुरीचे पीक समाधानकारक आले.
शासनाने हमीदर ७५०० रुपये प्रति क्विंटल ठेवल्याने व खुल्या बाजारात तुरीचे दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा हमीभावानुसार तूर विक्रीकडे कल आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तुरीची नोंद असलेला सात-बारा, आधारकार्ड, बँकेचे पासबुक यांची सत्यप्रत या कागदपत्रांची जुळवाजुळव देखील केली आहे. पण केंद्रावर नोंदणीला सुरुवात मात्र झालेली नव्हती. दरम्यान, तालुक्यातील हजारो शेतकरी नोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.