Jawari Mirchi Price : जवारी मिरचीला उच्चांकी दर

Market Update : मध्यंतरीच्या पावसामुळे जवारी मिरचीचे नुकसान झाले. मिरचीची आवक घटल्याने या मिरचीच्या दरात गेल्‍या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. यंदा आवक होणाऱ्या मिरचीला किलोला ८०० ते १५०० रुपये इतका दर मिळत आहे.
Jowari Chilly
Jowari ChillyAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : मध्यंतरीच्या पावसामुळे जवारी मिरचीचे नुकसान झाले. मिरचीची आवक घटल्याने या मिरचीच्या दरात गेल्‍या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. यंदा आवक होणाऱ्या मिरचीला किलोला ८०० ते १५०० रुपये इतका दर मिळत आहे. गेल्या वर्षी हाच दर ५०० ते ८०० रुपयापर्यंत होता. अजूनही आवक जेमतेमच असल्याने येत्या महिन्यात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता. २६) माद्याळ (ता. गडहिंग्‍लज) येथील मिरची उत्पादक रामगोंडा हळीगोंडा यांच्या मिरचीस गडहिंग्लज बाजार समितीत उच्चांकी १७०० रुपये किलो इतका दर मिळाला.कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज भागातील जवारी, अर्थात देशी मिरची प्रसिद्ध आहे. लाल व चवीला तिखट असलेल्या या मिरचीला ग्राहकांकडून नेहमीच चांगली पसंती असते.

Jowari Chilly
Chilly Export : पंधरा टन हिरव्या मिरचीची दुबईला निर्यात

कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या गडहिंग्लज येथील बाजार समिती मिरचीच्या सौद्यासाठी प्रसिद्ध आहे. या भागातील जवारी मिरची प्रसिद्ध आहे. तालुक्यातील बसर्गे, माद्याळ कसबा नूल, जरळी, मुगळी, बड्याचीवाडी, हेब्बाळ कसबा नूल, निलजी, मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) या भागात या मिरचीचे क्षेत्र पाहण्यास मिळते.

शिवाय आजरा तालुक्यातील बहिरेवाडी, हुक्केरी, भैरापूर आदी गावांतही लागवड होते. निचरा होणाऱ्या जमिनीत शेतकरी हे नगदी पीक म्हणून घेतात. ऑक्टोबरपासून सौद्यास सुरुवात साधारणतः ऑक्टोबरपासून सौद्यास सुरुवात होते. हंगामात दर तीन ते चार दिवसांनी तोडणी होऊन ती तीन ते चार दिवस वाळवून सौद्याला आणली जाते. अनेक शेतकरी आठवड्यातून एकदा पोती घेऊन येतात. यामुळे ताजा पैसा उपलब्ध होतो. एक एकर क्षेत्र असेल तर दोन महिन्यांपर्यंत उत्पादन सुरू राहाते. अर्थात, त्या त्या हंगामातील क्षेत्र, हवामान व उत्पादन यावर मिरचीची आवक अवलंबून असते.

Jowari Chilly
Green Chilli Rate : हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा

यंदा पावसामुळे मिरचीची वाढ खुंटली. अति पावसामुळे रोपांची उगवणही नीट झाली नाही. याचा फटका वाढीला व उत्पादनालाही बसला आहे. दिवाळीच्या दरम्यान हंगाम सुरू झाला. यंदा हवामान चांगले नसल्याने चांगल्या दर्जाच्या मिरचीची आवक अत्यल्प होत आहे. बाजार समितीत काहीशा खराब मिरचीची आवक होत आहे. ज्या शेतकऱ्यांची मिरची चांगली आहे. त्या शेतकऱ्याच्या मिरचीला मात्र व्यापाऱ्‍यांकडून चांगली पसंती असल्याचे चित्र आहे. यामुळे मोजक्या शेतकऱ्यांना यंदा गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट भाव मिळत असल्याचे गडहिंग्लज बाजार समितीतून सांगण्यात आले.

माझ्या वीस गुंठे क्षेत्रात मी मिरची घेतली आहे. यंदा प्रतिकूल परिस्थिती असतानाही चांगले व्यवस्‍थापन केल्याने मिरचीच्या दर्जा चांगला आहे. माझ्या नऊ किलो मिरचीला प्रति किलो १७०० रुपये या प्रमाणे दर मिळाला.
रामगोंडा हळीगोंडा, माद्याळ, ता. गडहिंग्लज
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगल्या मिरचीची आवक कमी असल्याने दर वाढलेले आहेत.
राजू जाधव, मिरची व्यापारी, गडहिंग्लज बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com