Ethanol Blending: देशातील १५ राज्यांत १८ टक्क्याहून अधिक इथेनॉल मिश्रण!

Petrol Ethanol Mix: देशातील इथेनॉल मिश्रण वेगाने वाढत असून, १५ राज्यांनी १८ टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिश्रण गाठले आहे. पश्चिम बंगालने १८.६८ टक्के मिश्रण करून आघाडी घेतली आहे, तर हरियाना (१८.६३%) आणि केरळ (१८.५%) यांनीही उल्लेखनीय प्रगती केली आहे.
Ethanol Blending
Ethanol BlendingAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: इथेनॉल मिश्रणामध्ये देशातील १५ राज्यांनी १८ टक्क्यांहून अधिक प्रमाणात इथेनॉलचे मिश्रण केले आहे. यंदाच्या इथेनॉल वर्षात फेब्रुवारीत या राज्यांनी हा पल्ला गाठला आहे.

पश्‍चिम बंगालने १८.६८ टक्के इथेनॉलचे मिश्रण करीत देशात अग्रक्रम पटकाविला आहे. त्या खालोखाल हरियानाने १८.६३ टक्‍के, तर केरळने १८.५ टक्के इथेनॉलचे मिश्रण करीत मिश्रणात वेग ठेवला आहे. सर्वात कमी मिश्रण अंदमान व निकोबार येथे ५ टक्के इतके झाले आहे.

Ethanol Blending
Ethanol Blending : फेब्रुवारीत इथेनॉल मिश्रण पोहोचले १९.७ टक्क्यांवर

गेल्या काही वर्षांपासून केंद्राने इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिल्याने बहुतांशी राज्यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा वेग वाढवला. अनेक राज्यांमध्ये अगदीच नाममात्र स्वरूपात इथेनॉल दहा वर्षांपूर्वी मिश्रण केले जात होते. पण केंद्राने निर्मितीला बळ दिले तसेच कंपन्यांनी इथेनॉल मिश्रण करावे याबाबत नियम कडक केले. यामुळे तेल कंपन्यांनीही पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणासाठी पुढाकार घेतला. परिणामी अनेक राज्येही इथेनॉल मिश्रणासाठी पुढे आल्याचे चित्र आहे.

१७ टक्क्यांहून अधिक मिश्रण उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आसाम, बिहार, झारखंड, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा मेघालय या राज्यांनी केले आहे. गोवा, लडाख इथे १५ टक्के इथेनॉल मिश्रण झाले आहे.

Ethanol Blending
Ethanol Price Hike: सी हेवी मोलॅसिस इथेनॉलची दरवाढ

अठरा टक्क्यांहून अधिक मिश्रण करणारी राज्ये

१८ टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिश्रण करणाऱ्या राज्यामध्ये तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, हरियाना, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल, पंजाब, ओडिशा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, दादरा आणि नगर हवेली, नागालँड, चंडीगड, पुद्दूचेरी आदी राज्यांचा समावेश आहे.

इथेनॉल निर्मितीसाठी पुरेसे धान्य उपलब्ध व्हावे

सध्या ऊस व धान्य या प्रमुख कच्च्या मालावरच इथेनॉलची निर्मिती सुरू आहे. केंद्राने साखर उद्योगाबरोबरच इथेनॉल निर्मितीसाठी धान्य पुरसे प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यंदाच्या खरिपातही मक्यासारख्या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी शेतकऱ्यांबरोबरच संस्थात्मक पातळीवर ही प्रयत्न करण्यात येत असल्याचे केंद्रीय सूत्रांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com