Tur Market : नगर बाजार समितीत तुरीला दहा हजारांपर्यंत दर

Tur Rate : नगर जिल्ह्यात तुरीच्या उत्पादन घेण्याला शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. जवळपास एक लाख साठ हजार हेक्टरपर्यंत तुरीची पेरणी होत असते.
Tur Market
Tur MarketAgrowon
Published on
Updated on

Nagar News : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला सध्या १०,५०० रुपयांपर्यंत प्रतिक्विटंलला दर मिळत आहे. सध्या बाजारात तुरीची आवक कमी असून, दररोज ४० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. ज्वारीची बऱ्यापैकी आवक होत असली तरी दरात फारशी वाढ झालेली दिसत नाही.

नगर जिल्ह्यात तुरीच्या उत्पादन घेण्याला शेतकरी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. जवळपास एक लाख साठ हजार हेक्टरपर्यंत तुरीची पेरणी होत असते. शिवाय शेजारच्या जिल्ह्यातूनही बाजार समितीत तूर विक्रीला येते. त्यामुळे बाजार समितीत तुरीची सातत्याने आवक सुरू असते.

Tur Market
Tur Rate : यवतमाळमध्ये तुरीला कमाल १२ हजार ३०० रुपये दर

यंदा तुरीची काढणी झाली त्या काळात तुरीला काहीसा दर कमी होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून तुरीचा दर स्थिर आहे. सध्या नगर येथे दर दिवसाला साधारणपणे ४० क्विंटलपर्यंत तुरीची आवक होत आहे. ९,५०० ते १०,५०० व सरासरी १० हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत.

Tur Market
Tur Cultivation : खानदेशात तूर लागवडीत वाढ

बाजारात सर्वाधिक ज्वारीची ४०० क्विंटलपर्यंत दर दिवसाला आवक होत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्वारीचे दर स्थिर आहेत, सध्या ज्वारीला २१०० ते ४२०० व सरासरी ३१५० रुपयांचा दर मिळत आहे. अलीकडच्या काळात बाजरीचा आहारात वापर वाढल्याने मागणीही वाढली आहे.

बऱ्याच दिवसांनंतर बाजरीच्या दरात काहीशी वाढ झालेली दिसते. बाजरीला २,१०० ते ३,००० हजार रुपयापर्यंत दर मिळत आहे. लाल मिरचीचे दरही सध्या १७ हजार रुपयापर्यंत असून १० हजार ५०० रुपयापर्यंत सरासरी दर मिळत आहेत. मुगाचे दर ७५०० पर्यंत, तर उडदाचे दर ८५०० हजार रुपयांपर्यंत मिळत असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com