Tur Cultivation : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Tur Farming : खानदेशात खरिपातील पिकांची लागवड सुरूच आहे. तूर लागवड यंदा काहीशी वाढली असून, सुमारे १५ हजार हेक्टरवर तूर लागवड अपेक्षित आहे.
Tur Cultivation
Tur CultivationAgrowon

Jalgaon News : खानदेशात खरिपातील पिकांची लागवड सुरूच आहे. तूर लागवड यंदा काहीशी वाढली असून, सुमारे १५ हजार हेक्टरवर तूर लागवड अपेक्षित आहे. तुरीचे दर मागील वेळेस स्थिर होते. बाजारात दर बऱ्यापैकी राहिल्याने शासकीय केंद्रात तूर विक्रीची वेळ आली नाही. शिवाय दुष्काळी स्थितीतही तूर पिकाने अनेकांना तारले.

तुलनेत कापूस पीक परवडले नाही. कमी खर्च व कमी पावसात येणारे पीक म्हणून खानदेशात तूर लागवड यंदा १५ हजार हेक्टरपुढे होईल, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत सुमारे १४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. लागवड कमाल क्षेत्रात पूर्ण झाली आहे. मागील वेळेस सुमारे आठ हजार हेक्टरवर तूर पीक खानदेशात होते.

Tur Cultivation
Tur Cultivation : तूर लागवडीसाठी वाण निवड

यात कमाल शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तूर लागवड केली होती. यंदा तुरीची स्वतंत्र लागवड जळगावमधील मुक्ताईनगर, रावेर, यावल, जामनेर, चोपडा, जळगाव भागात झाली आहे. काहींनी सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तूर लागवड केली आहे. तूर पीक लहान असताना सोयाबीनची चांगली वाढ होते व सोयाबीनची मळणी झाल्यानंतर तूर जोम धरते. यामुळे पट्टा पद्धतीने तूर लागवडही खानदेशात बऱ्यापैकी झाली आहे.

Tur Cultivation
Tur Market : तेजीनंतर आता तुरीचा बाजार दबावात

तुरीची लागवड वाढल्याने दर्जेदार बियाण्याची मागणीदेखील आहे. काही वाणांचा तुटवडा आहे. अनेक शेतकरी घरातील पारंपरिक, देशी वाणांची लागवड करीत आहेत. रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर भागात शेतकऱ्यांनी जूनच्या सुरवातीलाच पूर्वहंगामी तुरीची लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांचे तूर पीक एक महिन्याचे झाले आहे. त्यात आंतरमशाग, खते देण्याचे कामही पूर्ण झाले असून, पिकाने जोम धरला आहे. ही लागवड सहा बाय पाच फूट, सात बाय पाच फूट या अंतरात करण्यात आली आहे. अनेकांचे पीक अंकुरणाच्या स्थितीत आहे. पेरणीनंतर पाऊस झाल्याने तूर पेरणी यशस्वी झाली आहे.

तूर लागवडीत जळगावची आघाडी

जळगाव जिल्ह्यात ११ हजार ६०० हेक्टरवर तूर लागवड झाली आहे. तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे अडीच हजार हेक्टरवर तूर पीक आहे. आणखी एक हजार ते १२०० हेक्टरवर तूर लागवड होईल, असे संकेत आहेत. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर, रावेर भागात लागवड अधिक आहे. तिन्ही जिल्ह्यांत तूर लागवड वाढली आहे. अनेकांनी कापूस, ज्वारीऐवजी तुरीला पसंती दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com