Soybean Market Price : हिंगोलीत सोयाबीन ४२०० ते ४६३५ रुपये

Soybean Bhav : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) सोमवारी (ता. १६) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होती.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) सोमवारी (ता. १६) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४२०० ते कमाल ४६३५ रुपये तर सरासरी ४४१७ रुपये दर मिळाले.

हिंगोली येथील धान्य बाजारात नव्या तसेच जुन्या सोयाबीनची आवक होत आहे. नवीन सोयाबीनची आवक सुरू झाल्यानंतर किमान दर हमीभावाहून कमी झाले आहेत.पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक दर मिळतील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या (२०२२) हंगामातील सोयाबीनची विक्री केलेली नाही.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Soybean Market
Soybean Productivity : उमरगा तालुक्यात सोयाबीनचा उतारा घटला

परंतु गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांच्या खालीच आहेत. त्यात गेल्या काही आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

आवकेत वाढ होत आहे. यंदा पावसाच्या खंडामुळे सोयाबीनची उत्पादकता घटली आहे. अनेक भागात कीड, रोगामुळे दाण्याचा आकार देखील बारीक आहे. कमी दर दिले जात आहेत.

Soybean Market
Soybean Harvesting : सोयाबीन काढणीसाठी मजूरांची टंचाई

शुक्रवारी (ता. १३) सोयाबीनची ३०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ४१०० ते कमाल ४६०५ रुपये तर सरासरी ४३५२ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. १२) सोयाबीनची ३९९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४४११ रुपये तर सरासरी ४२५५ रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. ११) सोयाबीनची ४५० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ४१९९ ते कमाल ४५२५ रुपये तर सरासरी ४३६२ रुपये दर मिळाले.मंगळवारी (ता. १०) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ४२०० ते कमाल ४५६५ रुपये तर सरासरी ४३८२ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ९) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ४३३० ते कमाल ४६६१ रुपये तर सरासरी ४४९५ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com