Soybean Market : नवीन सोयाबीनलाही हमीभावापेक्षा कमी दर

New Soybean Arrival : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. सोयाबीनच्या आधारभूत किमतीपेक्षा (प्रतिक्विंटल ४६०० रुपये) ५०० ते ७०० रुपये कमी दराने सोयाबीन खरेदी केली जात आहे. किमान दर ३९०० रुपयांपर्यंत आहेत.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १२) सोयाबीनची ३९९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४१०० ते कमाल ४४११ रुपये तर सरासरी ४२५५ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. ११) सोयाबीनची ४५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४१९९ ते कमाल ४५२५ रुपये तर सरासरी ४२६२ रुपये दर मिळाले.

Soybean Market
Soybean Market : सोयाबीनच्या दरात घट

मंगळवारी (ता. १०) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक असतांना प्रतिक्विंटल किमान ४२०० ते कमाल ४५६५ रुपये तर सरासरी ४३८२ रुपये दर मिळाले. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता. १०) सोयाबीनची २५८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४४५० ते कमाल ४७०० रुपये तर सरासरी ४६०० रुपये दर मिळाले.

Soybean Market
Soybean Market : सोयाबीनच्या किमती हमीभावापेक्षा किंचित जास्त

सोमवारी (ता. ९) सोयााबीनची २७० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४३५० ते कमाल ४७०० रुपये तर सरासरी ४६५० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. १०) मानवत बाजार समितीत सोयाबीनची १९१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल किमान ३९०० ते कमाल ४५०० रुपये तर सरासरी ४४०० रुपये दर मिळाले.

परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदा सोयाबीनचा ५ लाख ४८ हजार हेक्टरवर पेरा आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाचा खंड व त्यानंतर मूळकुज, खोडकुज, येलो मोझॅक या रोगांचा प्रादुर्भाव तसेच अपरिपक्वतेच्या अवस्थेत पीक वाळून गेल्यामुळे उत्पादकेत मोठी घट येत आहे.

त्यामुळे मालाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. आर्थिक अडचणीमुळे शेतकरी नवीन सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. परंतु व्यापारी दर पाडून खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com