sandeep Shirguppe
फळांचा राजा हापूसची सध्या बाजारात रेलचेल सुरू आहे. कोल्हापूर बाजार समितीत सध्या हापूस आंब्याची आवक वाढली आहे.
मागच्या काही दिवसांपासून रोज सरासरी एक हजार बॉक्स येतात. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दर तेजीत आहे.
यंदा हापूसचे उत्पादन चांगले असल्याने मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात आवक वाढू लागेल.
दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ ते २० टक्के आवक वाढणार असल्याने हापूस आंब्याची मुबलक प्रमाणात गोडी चाखायला मिळणार आहे.
सध्या घाऊक बाजारात हापूस आंब्याचा दर ५०० ते १४०० रुपयांपर्यंत बॉक्सचा दर आहे. चांगल्या प्रतीचा आंबा १४०० रुपये बॉक्स आहे.
यंदा कोकणासह कर्नाटकात वादळी वाऱ्यामुळे फळबागांचे फारसे नुकसान झालेले नाही.
जानेवारीमधील पाऊस वगळता वातावरण पोषक राहिल्याने फळधारणा चांगली आहे.
हापूसचे पीक चांगले असल्याने सामान्य माणसाला भरपूर प्रमाणात आंबा खाण्यास मिळणार आहे.
गेल्यावर्षीपेक्षा यंदा आवक चांगली असून, कोकणाबरोबरच परराज्यातील आंबाही मोठ्या प्रमाणात येणार आहे.