Sugar Industry : साखर कारखान्यांना मे साठी २४ लाख टनांचा कोटा

देशातील साखर कारखान्यांना केंद्राने मे महिन्यासाठी २४ लाख टनांचा कोटा वाटप केला आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या तुलनेत तो दीड लाखाने अधिक आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : देशातील साखर कारखान्यांना केंद्राने मे महिन्यासाठी २४ लाख टनांचा कोटा वाटप केला आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या तुलनेत तो दीड लाखाने अधिक आहे. मे मध्ये साखरेची टंचाई निर्माण होऊन किरकोळ बाजारात साखरेच्या किमती जास्त वाढू नयेत, या साठी अतिरिक्त दीड लाख टनांचा साखर कोटा (Sugar Quota) वाढवून दिला आहे.

Sugar Production
Sugar Market : मे महिन्यात कारखान्यांना २४ लाख टन साखर विक्रीचा कोटा

सध्या देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आहे. उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक साखर कारखाने सुरू आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या किमती गेल्या एक महिन्यापासून वाढलेल्या आहेत. उन्हाळ्यामुळे शीतपेय उद्योगातून साखरेला मागणी सातत्याने वाढत आहे.

Sugar Production
Sugar Market : साखरेच्या किमान विक्री दरात वाढीसाठी पंतप्रधानांना साकडे

यामुळे साखरेच्या किमतीत क्विंटलला २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानेही किमान साखर विक्रीची किंमत वाढवून देण्याची मागणी केली आहे.

साखरेच्या नव्या निर्यात धोरणाबाबत केंद्र शासनाने अजूनही कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे सध्या तरी साखर विक्रीची सर्व भिस्त स्थानिक विक्रीवर असेल. शीतपेय उद्योगातून साखरेला मागणी वाढत असल्याने मे महिना हा साखर उद्योगासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

...तर टंचाई निर्माण होऊ शकते

मे महिन्यात साखर विक्रीचा कोटा कमी दिला तर बाजारात साखरेची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे साखरेच्या किमती किरकोळ बाजारात वाढू शकतात. अशी परिस्थिती येऊ नये यासाठी केंद्राने गेल्या मे महिन्याच्या तुलनेत यंदाच्या मे महिन्यात दीड लाख टनांनी साखर कोटा वाढवून दिल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com