Sugar Industry : साखरेची माहिती वेळेत पुरवा; अन्यथा कोटा नाही

साखर कारखान्यांमधील साखर उत्पादन, विक्री ते निर्यात यावर केंद्राचे नियंत्रण आहे. त्यासाठी कारखान्यांना सतत केंद्राकडे माहिती सादर करावी लागते.
Sugar Mill
Sugar MillAgrowon
Published on: 
Updated on: 

Sugar Industry पुणे ः साखर कारखान्यांनी (Sugar Mill) राखीव साठ्याची ऑनलाइन माहिती वेळेत सादर न केल्यास एप्रिलचा साखर विक्री कोटा (Sugar Quota) दिला जाणार नाही, असा इशारा केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिला आहे.

साखर कारखान्यांमधील साखर उत्पादन, विक्री ते निर्यात यावर केंद्राचे नियंत्रण आहे. त्यासाठी कारखान्यांना सतत केंद्राकडे माहिती सादर करावी लागते. यापूर्वी बहुतेक माहिती ऑफलाइन पद्धतीने दिली जात होती.

मात्र, केंद्राने राष्ट्रीय एक खिडकी प्रणाली (एनएसडब्ल्यूएस पोर्टल) सुरू करीत ऑफलाइन पध्दत मोडीत काढली आहे. या प्रणालीसाठी स्वतंत्र संकेतस्थळावर कारखान्यांना ऑनलाइन माहिती भरण्याची सुविधा आता उपलब्ध करून दिली आहे.

Sugar Mill
Sugar Market : आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय पांढऱ्या साखरेला पसंती

एनएसडब्ल्यूएस संकेतस्थळाच्या पी-२ व्यासपीठावर (पी-सेकंड प्लॅटफॉर्म) कारखान्यांनी माहिती पाठविणे बंधनकारक आहे. कारण, याच माहितीच्या आधारे केंद्राकडून साखर उद्योगविषयक निर्णय घेतले जात आहेत.

त्यासाठी साखर उत्पादन, पुरवठा, मासिक साठा मर्यादा अशी माहिती पी-२ व्यासपीठाकडे वेळेत देण्याची गरज असते. अन्न मंत्रालयाच्या साखर संचालनालयाचे संचालक श्री. संगीत यांनी अलीकडेच साखर कारखान्यांना जारी केलेल्या एका आदेशात नाराजी व्यक्त केली आहे

Sugar Mill
Sugar Market : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचा माहोल

“संकेतस्थळावर ऑनलाइन माहिती पाठविण्याबाबत कारखान्यांना यापूर्वी वारंवार सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत ऑनलाइन माहिती पाठवलीच पाहिजे.

फेब्रुवारीची माहिती मार्चअखेरीस वेळेत न पाठविल्यास अशा साखर कारखान्यांना एप्रिलचा मासिक विक्री कोटा दिला जाणार नाही,” अशी तंबी साखर संचालकांनी दिली आहे.

साखर कारखान्यांनी WWW.nsws.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पाठविलेली माहिती स्वीकारली जाणार नाही. तसेच ऑफलाइन पाठविलेली माहितीही विचारात घेतली जाणार नाही, असेही साखर संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

‘एफआरपी’ची माहिती पुरवणे बंधनकारक

नव्या प्रणालीत माहिती देताना कारखान्यांकडून आता ऊस उत्पादकांना किती एफआरपी दिली, किती थकविली, इथेनॉलच्या बी-हेव्ही, सी-हेव्ही, रस व पाक यासाठी किती साखर वळविली, याचीही माहिती द्यावी लागत आहे.

याशिवाय कच्च्या किंवा पांढऱ्या साखरेची आयात, निर्यात तसेच देशांतर्गत साखरेची किती वाहतूक केली याचीदेखील माहिती पुरवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com