Sugar Production: इथेनॉल निर्मितीसाठी साखर वापरण्यास आडकाठी?

Team Agrowon

 साखर उद्योगातील विविध संस्थांनी यंदा साखर उत्पादन अपेक्षे इतके घटणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतरही केंद्र शासन अजूनही इथेनॉल निर्मिती वाढविण्यासाठी साखरेस आणखी परवानगी देण्याच्या मानसिकतेत नसल्याचे चित्र आहे.

Sugar Production | Agrowon

सध्या या हंगामातील १७ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यास केंद्राची परवानगी आहे.

Sugar Production | Agrowon

गेल्या पंधरा दिवसांमध्ये देश पातळीवरील विविध संस्थांनी केंद्राकडे इथेनॉलकडे साखर वळवण्यास आणखी परवानगी द्यावी, अशी मागणी लावून धरली आहे.

Sugar Production | Agrowon

जरी उत्पादनाचे अंदाज साखर उद्योगातील संस्थानी दिले असले तरी केंद्रीय सूत्रांनी अद्यापही त्यावर विचार केलेला नाही.

Sugar Production | Agrowon

जोपर्यंत केंद्राची पुरेशा साखर उत्पादनाबाबत खात्री होत नाही तोपर्यंत वाढीव परवानगी मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

Sugar Production | Agrowon

येणाऱ्या एक, दोन महिन्यांमध्ये निवडणुकांचा कालावधी असल्याने केंद्र शासन खुल्या बाजारात साखरेचे दर वाढविण्यासाठी पूरक गोष्टींना परवानगी देणे अशक्य असल्याचे अन्न सार्वजनिक पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Sugar Production | Agrowon
क्लिक करा