Rice : तेलंगणातील फोर्टिफाईड तांदळाची केद्राकडून खरेदी

तेलंगणातील हा फोर्टिफाईड तांदूळ आयर्न, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी १२ युक्त आहे. केंद्र सरकार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून या तांदळाचं वितरण करेल.
Rice Export
Rice ExportAgrowon
Published on
Updated on

केंद्र सरकार भारतीय अन्न महामंडळाच्या (Food Corporation of India- FCI) माध्यमातून तेलंगणातून अतिरिक्त आठ लाख टन फोर्टीफाईड तांदूळ खरेदी (Fortified Rice Procurement) करणार आहे. एफसीआयने यापूर्वी सहा लाख टन तांदूळ खरेदी (Rice Procurement) करण्याचं मान्य केलं होतं. मात्र तेलंगणा सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकार हा अतिरिक्त तांदूळ खरेदी करणार आहे.

तेलंगणातील हा फोर्टिफाईड तांदूळ आयर्न, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी १२ युक्त आहे. केंद्र सरकार सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून या तांदळाचं वितरण करेल.

Rice Export
Rice : कामडी यांच्या ‘अश्विनी’ची राष्ट्रीय पातळीवर नोंद

यावर्षीच्या सुरुवातीलाच तांदळाच्या खरेदीवरून तेलंगणा सरकार आणि केंद्र सरकारमधील संघर्ष पेटला होता. परबॉईल्ड तांदळाच्या खरेदीवरून केंद्र आणि राज्य सरकारकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात होते.

यंदाच्या खरीप हंगामात तेलंगामात दोन आठवडे सतत पाऊस पडला आणि त्यामुळे राज्यात पूरस्थिती निर्माण झाली. दरम्यानच्या काळात तेलंगणातील राईस मिलमध्ये तांदळाचा प्रचंड मोठा साठा पडून होता. या साठ्याचं नुकसान होऊ लागलं आणि हा प्रश्न गुंतागुंतीचा बनला.

शेवटी पाण्यात भिजलेला पाच लाख टन तांदळाचा साठा वाया जाण्याच्या भीतीने तेलंगणा सरकारने केंद्राकडे धाव घेतली. भारतीय अन्न महामंडळाला फोर्टीफाइड परबॉइल्ड तांदळाचा पुरवठा करता येईल का यासंदर्भात विचारणा करण्यात आली.

तेलंगणाच्या या विनंतीला केंद्र सरकारनेही प्रतिसाद दिला. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने तेलंगणाच्या नागरी पुरवठा आयुक्तांना ३० जुलै रोजी पत्र लिहून तेलंगणातील अतिरिक्त ८ लाख टन फोर्टीफाइड परबॉइल्ड तांदूळ खरेदी करणार असल्याचं सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com