Cotton Rate : गुजरातमधून कापसाची खरेदी सुरू

गुजरातमधून खानदेशातील कापसाची खरेदी सुरू झाली आहे. पण दर प्रतिक्विंटल आठ हजार रुपये ते आठ हजार १०० रुपयांपर्यंत आहेत. गुजरात निवडणुकीनंतर कापूस प्रक्रिया उद्योग सुरू होत आहेत. परिणामी कापसाची खरेदी सुरू झाली आहे.
Cotton Rate | Cotton purchase in Gujarat
Cotton Rate | Cotton purchase in GujaratAgrowon
Published on
Updated on

Jalgaon: गुजरातमधून खानदेशातील कापसाची खरेदी (Cotton Procurement) सुरू झाली आहे. पण दर प्रतिक्विंटल आठ हजार रुपये ते आठ हजार १०० रुपयांपर्यंत आहेत. गुजरात निवडणुकीनंतर कापूस प्रक्रिया उद्योग (Cotton Processing Industry) सुरू होत आहेत. परिणामी कापसाची खरेदी सुरू झाली आहे.

गुजरातमध्ये निवडणुकीमुळे खानदेशातील कापूस खरेदी संथ होती. स्थानिक भागातील काही कारखानदार खरेदी करीत होते. परंतु दर कमी होते. अनेक शेतकरी मात्र आठ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल या दरात कापूस विक्रीस तयार नाहीत. गुजरातमधून मागील काही दिवसांपासून नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांतील कापसाला उठाव आहे. पण खरेदी सध्या रखडत सुरू आहे.

Cotton Rate | Cotton purchase in Gujarat
Cotton Import Duty : कापसावरील आयातशुल्क कायम ठेवा

कारण शेतकरी कापूस विक्री फारशी करीत नसल्याचे चित्र आहे. दर प्रतिक्विंटल आठ हजार ते आठ हजार १०० रुपयांपर्यंत आहेत. जेथे एकाच घरात ८० ते ९० क्विंटल दर्जेदार कापूस उपलब्ध होत आहे, तेथे आठ हजार १०० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे.

Cotton Rate | Cotton purchase in Gujarat
Cotton Rate : कापूस, कांद्याच्या आवकेत वाढ

नोव्हेंबरच्या सुरुवातीला काही शेतकऱ्यांना नऊ हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलचा दर मिळाला. परंतु अनेक शेतकरी या दरात कापूस विक्रीस तयार नाहीत. किमान १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. यामुळे गुजरातमधील खरेदीदारांनाही कमी प्रतिसाद मिळत आहे.

खेरदीसाठी स्थानिक एजंटांची मदत

गुजरातमधील खरेदीदार नंदुरबारमधील नंदुरबार, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल, अमळनेर आदी भागांतून खरेदी करीत आहेत. स्थानिक एजंटची मदत कापूस खरेदीसाठी तेथील खरेदीदार घेत आहेत.

‘जिनिंग-प्रेसिंग’ची धडधड कमी

खानदेशात कापसाची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये सुमारे दोन लाख गाठींच्या कापसाची आवक झाली होती. त्या काळात दरही आठ हजार रुपयांपर्यंत होते. कापसाची आवक कमी असल्याचा मुद्दा खरेदीदार, व्यापारी उपस्थित करीत आहेत. दर आठ हजार रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर आहेत. त्यात मोठी पडझड मागील आठ ते १० दिवसांत झालेली नाही. कापसाची आवक कमी असल्याने खानदेशातील जिनिंग-प्रेसिंग कारखानेदेखील कमी क्षमतेने सुरू आहेत. काही कारखाने बंदच आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com