Cotton Rate : परभणीत खासगी कापूस खरेदी दरात सुधारणा

Cotton Market : चालू खरेदी हंगाम अखेरच्या टप्प्यात पोहोचला असताना परभणी जिल्ह्यातील मानवत, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांतील खासगी खरेदीच्या दरात थोडी सुधारणा झाली आहे.
Cotton Procurement
Cotton ProcurementAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : चालू खरेदी हंगाम अखेरच्या टप्प्यात पोहोचला असताना परभणी जिल्ह्यातील मानवत, परभणी या कापसाच्या प्रमुख बाजारपेठांतील खासगी खरेदीच्या दरात थोडी सुधारणा झाली आहे. एफएक्यू (सुपर) दर्जाच्या कापसाला हमीभावापेक्षा १०० ते २५० रुपये जास्त दर मिळत आहेत. फरदड कापसालादेखील सहा हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहेत.

रविवारी (ता. ३०) परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची १०० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान ६६७० ते कमाल ६८५० रुपये तर सरासरी ६७६० रुपये (एफएक्यू-सुपर दर्जाच्या कापसास प्रतिक्विंटल ७८०० रुपये) दर मिळाले. खासगी खरेदी दरात सुधारणा झाल्यामुळे मागील पंधरवाड्यापासून अनेक ठिकाणची सीसीआयची कापूस खरेदी ठप्प झाली आहे.

यंदा (२०२४-२५) खरेदी हंगामाच्या प्रारंभी खासगी खरेदीचे दर आणि हमीभाव यांच्यामध्ये ३०० ते ५०० रुपयांपर्यंत फरक होता. त्या वेळी जाचक अटी असल्या तरी सीसीआयला कापूस विक्री करण्यास शेतकऱ्यांची पसंती राहिली. परभणी जिल्ह्यातील सीसीआयच्या परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड ताडकळस या ८ केंद्रांवरील १७ जिनिंग कारखान्यांमध्ये बुधवारपर्यंत (ता. २६) १३ लाख ७१ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली.

Cotton Procurement
Cotton Production : देशात कापूस उत्पादनात ६० लाख गाठींची तूट ; डॉ. वाय. जी. प्रसाद ः सुधारित बियाण्यांसह व्यापक उपायांची गरज

खासगीमध्ये ९ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ३९ जिनिंग कारखान्यामध्ये ४ लाख ९३ हजार ३०९ क्विंटल कापूस खरेदी झाली. मार्चच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून जिल्ह्यातील खासगी खरेदीच्या कापूस दरात सुधारणा झाली. परभणी बाजार समितीमध्ये होणाऱ्या कापसाच्या आवकेत ३० टक्के कापूस एफएक्यू (सुपर) दर्जाचा तर ७० टक्के कापूस फरदड आहे. परभणी बाजार समितीत शनिवारी (ता. २९) कापसाची ११०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६३५० ते कमाल ७८०० रुपये तर सरासरी ७७५० रुपये दर मिळाले.

Cotton Procurement
Cotton Farming Award: उच्चांकी कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान; ‘राष्ट्रऋषी नानाजी देशमुख पुरस्कार’ प्रदान!

मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २७) कापसाची १२५० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान ७५१० ते कमाल ७७४० रुपये तर सरासरी ७६२० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २६) कापसाची १५५० क्विंटल आवक असताना किमान ७५५० ते कमाल ७७८० रुपये तर सरासरी ७६७० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २५) १६५० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ७५४० ते कमाल ७८०० रुपये तर सरासरी ७६७० रुपये दर मिळाले.

घरात साठवणूक केलेल्यांना फायदा

दरवाढ होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सीसीआयच्या केंद्रांवर कापूस विक्री केला. विविध कारणांनी सीसीआयची खरेदी बंद राहिली. त्या वेळी खासगीत कमी दराने कापूस विकावा लागला. परंतु अनेक शेतकऱ्यांनी दर वाढीच्या आशेने घरात कापूस ठेवला त्यांना तसेच फरदडचे उत्पादन घेतले त्या शेतकऱ्यांना तसेच सुरुवातीला शेतकऱ्यांकडून कमी दराने कापूस खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांना दर वाढीचा फायदा होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com