Cotton Production : देशात कापूस उत्पादनात ६० लाख गाठींची तूट ; डॉ. वाय. जी. प्रसाद ः सुधारित बियाण्यांसह व्यापक उपायांची गरज

Cotton Farming : देशात पहिल्यांदाच लागवड क्षेत्र कमी असताना २०१३-१४ मध्ये ३५९ लाख गाठींचा पल्ला गाठता आला होता. सद्यःस्थितीत सुमारे ६० लाख गाठीची तूट असून, ती भरून काढण्यासाठी व्यापक उपायांची गरज असल्याचे मत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्‍त केले.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon
Published on
Updated on

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः देशात पहिल्यांदाच लागवड क्षेत्र कमी असताना २०१३-१४ मध्ये ३५९ लाख गाठींचा पल्ला गाठता आला होता. सद्यःस्थितीत सुमारे ६० लाख गाठीची तूट असून, ती भरून काढण्यासाठी व्यापक उपायांची गरज असल्याचे मत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्‍त केले.

डॉ. प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात १९९३-९४ या वर्षात ७३.२ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होती. त्या वेळी १०७.४ लाख गाठींची उत्पादकता आणि रुईचे उत्पादन २४९ किलो प्रति हेक्‍टर इतके होते. त्यानंतरच्या काळात व्यवस्थापनात बदलाच्या माध्यमातून सातत्याने उत्पादकता व उत्पादनात वाढ नोंदविली गेली आहे. १९९९-२००० या वर्षात ८७.१ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होती. यातून ११५.३ लाख गाठी आणि रुईची उत्पादकता २२४ किलो प्रति हेक्‍टर इतकी मिळाली.

Cotton Production
Cotton : देशात एक कोटी १० लाख कापूस गाठींची आवक

कापसात जीएम तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पिकाचे सिंचन व इतर बाबींच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. त्यातूनच उत्पादकता आणि उत्पादनात वाढ झाल्याचे निरीक्षण आहे. २०१३-१४ या वर्षात तर ११९.६ लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली. यातून विक्रमी ३५९ लाख गाठी आणि ५१० किलो रुई प्रति हेक्‍टर असा सर्वोच्च उतारा मिळाला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच या वर्षी विक्रमी उत्पादकता नोंदविली गेली. त्यानंतर २०१९-२० या वर्षात १३४.८ लाख हेक्‍टर क्षेत्रातून पुन्हा ३६०.७ लाख गाठी आणि ४५५ किलो रुई प्रति हेक्‍टर असा उतारा मिळविता आला.

मात्र या वेळी लागवड क्षेत्र सरासरीपेक्षा जास्त होते. लागवड क्षेत्रात वाढीच्या परिणामी २०१९-२० या वर्षात उत्पादकता आणि उत्पादनात वाढ झाल्याचे निरीक्षण आहे. उत्पादकता आणि उत्पादनात वाढीसाठी २०१३-१४ हेच वर्ष पोषक ठरले होते, असेही डॉ. प्रसाद यांनी सांगितले. कापूस उत्पादकता वाढीसाठी केंद्र शासनाकडून पाच वर्षांसाठी कॉटन मिशन नावाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सुमारे २५०० कोटी रुपयांची तरतूद याकरिता असून, प्रतिवर्ष सरासरी ५०० कोटी रुपयांचा खर्च यावर होणार आहे.

उत्पादकतेत यंदा घट

२०१०-११ मध्ये ११२.४ लाख हेक्‍टरवर कापूस लागवड होती. या माध्यमातून ३३० लाख गाठी आणि ४९९ किलो रुई प्रति हेक्‍टर असा उतारा मिळाला. २०२४-२५ यावर्षीच्या हंगामात ११४ लाख हेक्‍टर क्षेत्र असताना कापसाची उत्पादकता २९५ लाख गाठी आणि रुई उतारा ४३७ किलो प्रति हेक्‍टर इतकी अत्यल्प मिळाला आहे.

जमीन आरोग्य, सुधारित बियाणे, अचूक शेती पद्धती (प्रिसीजन फार्मिंग), वातावरणातील बदल या घटकांकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या कापूस उत्पादनात ६० लाख गाठींची तूट आहे. या पिकाला वाढीच्या अवस्थेत संतुलित पावसाची गरज राहते. सध्या पाऊसमान अनिश्‍चित असून एकाचवेळी धो-धो बरसतो. त्याचाही परिणाम पिकाच्या उत्पादकतेवर झाला आहे.

- डॉ. वाय.जी. प्रसाद,

संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

दरातील अस्थिरतेमुळे लागवड क्षेत्रात घट

वर्ष ः लागवड क्षेत्र लाख हेक्‍टरमध्ये

२०१९- २० ः १३२.९

२०२०- २१ ः १२३.७

२०२२- २३ ः १२९.२७

२०२३- २४ ः १२६.८८

२०२४- २५ ः ११४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com