
Vardha News: हंगामाच्या सुरुवातीच्या तुलनेत सध्या बाजारात येणाऱ्या कापसातील ओलाव्यात झालेली घट त्याबरोबरच सरकीच्या दरातील तेजीच्या परिणामी देशभरात कापसाच्या दरात तेजी नोंदविण्यात आली आहे. सध्या कापसाचे व्यवहार सात हजार रुपयांवरून ८ हजार रुपये क्विंटलने होत आहेत.
केंद्र सरकारने मध्यम धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल ७१२१ तर लांब धाग्याच्या कापसासाठी ७५२१ रुपयांचा दर जाहीर केला होता. मात्र संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांकडून कापसाची या दराने खरेदी झाली नाही. एकीकडे कापसाची उत्पादकता कमी होत एकरी चार ते पाच क्विंटलवर स्थिरावरली आहे. त्यातच उत्पादकता खर्च वाढता आणि दरही कमी अशी स्थिती कापूस उत्पादकांची झाली होती.
या साऱ्यातून कापसाचा उत्पादकता खर्चही निघाला नाही. त्याचा परिणाम कापूस लागवड क्षेत्रावरही नोंदविण्यात आला आहे. आता कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना आणि शेतकऱ्यांकडील देखील जेमतेम साठा उरला असताना कापसाच्या दरात प्रति क्विंटल एक हजार रुपयांची तेजी नोंदविण्यात आली. हंगामाच्या सुरुवातीला कापसातील ओलावा १० ते १४ टक्के राहतो. आता तो ६ ते ७ टक्क्यांवर आला आहे. सरकीच्या दरातही वाढ झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
सरकीचे दर बाजारात ३२०० ते ३३०० रुपये क्विंटल होते. आता त्यात वाढ होत ३७०० रुपये क्विंटलने सरकीचे व्यवहार होत आहेत. या साऱ्याच्या परिणामी कापूस दर तेजीत आले आहेत. सरकीचा वापर तेलासाठी होतो त्याबरोबरच प्रक्रियेदरम्यान ढेप मिळते. या मूल्यवर्धीत पदार्थांचा वापर आहार आणि पशुआहारात होतो. या बाजारातील तेजीच्या परिणामी कापसाचे दर तेजीत आले आहेत.
हिंगणघाट (वर्धा) बाजार समिती कापसासाठी प्रसिद्ध आहे. सध्या देखील या बाजारात मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक होत आहे. जिनिंग व्यवसायिकांना बाजारातील लिलाव प्रक्रियेत सहभागी होत कापसाची खरेदी करावी लागते. हा संपूर्ण व्यवहार पारदर्शी असल्याने शेतकरी या ठिकाणी कापूस विक्रीसाठी आणतात, अशी माहिती बाजार समिती सचिव तुकाराम चांभारे यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.