Potato Price : पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे दर घसरले; शेतकऱ्यांना फटका

देशात बटाटा उत्पादनात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, मध्यप्रदेश आदि राज्य अग्रेसर आहेत. त्यापाठोपाठ पंजाब, हरियाणा, आसाम, झारखंड, महाराष्ट्र राज्यात बटाट्याचे पीक घेतले जाते.
Potato
PotatoAgrowon

पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे भाव घसरले आहेत. गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत ३० टक्क्यांनी बटाट्याचे दर घसरले आहेत. बटाटा निर्यातीच्या मागणीत घट झाली आहे. तसेच बटाटा उत्पादनात आघाडीवर असलेल्या झारखंडमध्ये आवकेचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु बाजारात मागणी नसल्याने बटाट्याचे दर पडल्याचे जाणकार सांगतात. 

पश्चिम बंगालच्या स्थानिक बाजारातील कमी मागणी आणि नवीन मालाची आवक वाढल्यामुळे शेजारील बांग्लादेशला बटाट्याची निर्यात वाढली होती. कारण बांगलादेशवर मागील ११ वर्षात पहिल्यांदाचा बटाटा आयातीची वेळ ओढावली होती. निर्यातीला मागणी वाढल्यामुळे चालू हंगामात किरकोळ बाजारातील बटाट्याचे दर २० रुपये किलोवर पोहचले होते. परंतु बांगलादेशमध्ये बटाटा आवकेचा हंगाम सुरू झाला आणि आयातीची मागणी घटली. त्यामुळे बाजारातील दरही घसरले, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

Potato
Potato Market : राज्यात बटाटा ७०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल

देशात बटाटा उत्पादनात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, मध्यप्रदेश आदि राज्य अग्रेसर आहेत. त्यापाठोपाठ पंजाब, हरियाणा, आसाम, झारखंड, महाराष्ट्र राज्यात बटाट्याचे पीक घेतले जाते. यंदा झारखंडमधील माल बाजारात लवकर दाखल झाला आहे. परंतु मागणीत घट झाली आहे. त्याचा फटका येथील शेतकऱ्यांना बसतो आहे. पश्चिम बंगाल सरकारने पुढाकार घेऊन किमान खरेदी भाव जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. फेब्रुवारी महिन्यात बटाटाचे उत्पादन वाढले होते. त्यामुळे बटाट्याचे दर घसरले होते. त्यावेळी पश्चिम बंगाल सरकारने किमान खरेदी भाव ६५० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केला होता. त्याचा मार्च महिन्यात बाजाराला आधार मिळाला होता. 

पश्चिम बंगालमधील कोलकत्ता किरकोळ बाजारात बटाट्याला सध्या प्रतिकिलो १४ रुपये दर मिळतोय. मागील वर्षभरातील निच्चांकी दर बटाट्याने गाठला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत बटाट्याला २० रुपये दर मिळाला, अशी माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.  पश्चिम बंगालमध्ये २०२२-२३ मध्ये बटाट्याची लागवड ४.६० लाख हेक्टर क्षेत्रावर होती. त्यातून १०० लाख टन उत्पादन मिळालं होतं. 

पश्चिम बंगालमध्ये बटाट्याच्या ज्योती या वाणाची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. कारण त्याची उत्पादकता अधिक आहे. परंतु सध्या मात्र बाजारातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होत नाही. शेतकरी अडचणीत सापडले आहे. पुढील काळात पंजाबमधील मालही बाजारात दाखल होईल. त्यामुळे पुढील काळातही बटाटाचे दर दबावात राहतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com