Wheat Cultivation : मध्य भारतात गव्हाचा पेरा वाढण्याची शक्यता

कडधान्यांना मिळणारा भाव हा आधारभूत किंमतीपेक्षाही कमी असल्याने मध्य भारतातील शेतकरी आता हरभरा सोडून गव्हाची लागवड करण्याची शक्यता आहे. यावर्षी कडधान्यांच्या किंमती प्रति क्विंटलमागे 5,230 पेक्षाही कमी राहिल्या आहेत.
Wheat Cultivation
Wheat Cultivation Agrowon

कडधान्यांना मिळणारा भाव (Pulses Rate) हा आधारभूत किंमतीपेक्षाही (Pulses MSP) कमी असल्याने मध्य भारतातील शेतकरी आता हरभरा (Chana) सोडून गव्हाची लागवड (Wheat Cultivation) करण्याची शक्यता आहे. यावर्षी कडधान्यांच्या किंमती (Pulses Rate) प्रति क्विंटलमागे 5,230 पेक्षाही कमी राहिल्या आहेत.

Wheat Cultivation
Wheat Rate : गव्हाचे दर पुन्हा वाढले

मध्यप्रदेश हरभऱ्याचं सर्वात मोठं उत्पादक राज्य आहे. इथल्या बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचा दर (ज्या दराने बहुतेक व्यवहार होतात) प्रति क्विंटल 4,000 आणि 4,500 रुपयांच्या दरम्यान आहे. राजस्थान आणि महाराष्ट्रातील बाजार समित्यांमधील दर याच दरम्यान आहेत.

सरकारने 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी हरभऱ्याच्या किमान आधारभूत किंमतीत दोन टक्क्यांनी वाढ करून 5,355 रुपये इतका दर निश्चित केला आहे. हरभऱ्याच्या पेरणीलाही आता सुरुवात झालीय. 14 ऑक्टोबर अखेर राजस्थानमधील सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची लागवड करण्यात आलीय.

ओरिगो कमोडिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ व्यवस्थापक इंद्रजित पॉल सांगतात की, "शेतकऱ्यांना यावर्षी चांगला दर न मिळाल्याने आगामी रब्बी हंगामात हरभऱ्याच्या एकरी उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. गेल्या वर्षी दर चांगले होते त्यामुळे एकरी उत्पादन वाढलं होतं. त्यामुळे यावर्षी बरेचसे शेतकरी हरभऱ्याऐवजी गव्हाला पसंती देऊ शकतात."

गेल्या रब्बी हंगामात हरभऱ्याचं एकूण लागवडीखालील क्षेत्र 114. 95 लाख हेक्टर इतकं होतं. हेच क्षेत्र 2020 मध्ये 110 लाख हेक्टर पेक्षा कमी होतं. 2020 मध्ये दर चांगले मिळाले म्हणून हरभऱ्याच्या क्षेत्रात 4 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसलं. अहमदाबादमधील पुनित बचावत सांगतात की, "यावर्षीचे दर फार आशादायी नाहीयेत. त्यामुळे शेतकरी यावर्षी हरभऱ्याकडे वळण्याची शक्यता तशी कमीच आहे. पण सध्या हरभरा लागवडीसाठी पोषक वातावरण आहे." महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात पाऊस पडल्याने पेरण्यांना उशीर होऊ शकतो असंही त्यांनी सांगितलं.

चौथा आगाऊ अंदाजानुसार, 2021-22 मध्ये हरभऱ्याचं उत्पादन 137.5 लाख टन इतक्या विक्रमी उच्चांकावर पोहोचलंय. सरकारी संस्थांनी 30 जून 2022 पर्यंत 25.5 लाख टनांपेक्षा जास्त हरभरा खरेदी केलाय. मागच्या वर्षी हीच खरेदी 6.31 लाख टन इतकी होती. म्हणजेच यावर्षी खरेदी चार पटीने वाढलीय. सरकारने पुढच्या रब्बी हंगामासाठी 135 लाख टन उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलंय.

हरभऱ्याचा साठा

आयग्रेन इंडियाचे राहुल चौहान म्हणतात की, "मध्य भारतातले शेतकरी हरभरा सोडून गव्हाचा पेरा वाढवतील." अखिल भारतीय दाल मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल म्हणाले की, "10 ते 15 टक्के हरभरा उत्पादक शेतकरी गहू, मसूर पिकांकडे वळू शकतात. पण यावर आत्ताच काही बोलणं अवघड आहे." अग्रवाल पुढे म्हणाले की, सध्या सरकारी गोदामात हरभऱ्याचा साठा 20 लाख टनांपेक्षा जास्त आहे. येणाऱ्या काही महिन्यांत किंमतीवर दबाव वाढू शकतो. मात्र सणासुदीच्या काळात सुद्धा हरभाऱ्याच्या दरात किलोमागे 3 ते 4 रुपयांचीच वाढ झालीय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com