Agriculture Commodity Market : सोयाबीन, कापसाचे जागतिक उत्पादन वाढण्याचा अंदाज

Kharif Crop MSP : केंद्र सरकारने १९ जून रोजी २०२४-२५ हंगामासाठी १४ खरीप पिकांसाठी हमीभाव जाहीर केले. फॉरवर्ड विक्रीचा करार करण्यासाठीसुद्धा या हमीभावांचा उपयोग करता येईल.
Cotton, Soybean
Cotton, Soybean Market Agrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमती ः सप्ताह १५ ते २१ जून २०२४

केंद्र सरकारने १९ जून रोजी २०२४-२५ हंगामासाठी १४ खरीप पिकांसाठी हमीभाव जाहीर केले. फॉरवर्ड विक्रीचा करार करण्यासाठीसुद्धा या हमीभावांचा उपयोग करता येईल. सध्या कापूस व मका यांच्यासाठी फ्यूचर्स व्यवहार उपलब्ध आहेत. जर फ्यूचर्स किंमत हमीभावापेक्षा अधिक असेल तर फ्यूचर्स विक्री (किंवा हेजिंग) हंगाम सुरू होण्याअगोदर करता येईल.

कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांचे भाव आंतरराष्ट्रीय किमतींवर अवलंबून आहेत. अमेरिकी कृषी खात्याने (यूएसडीए) या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसार, २०२४-२५ या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाचे जागतिक उत्पादन ४.७ टक्के वाढण्याची शक्यता आहे. वर्षअखेर साठासुद्धा ३.१ टक्के वाढेल असा अंदाज आहे. सोयाबीनचे उत्पादनसुद्धा यावर्षी ६.७ टक्के व वर्षअखेर साठा १५.७ टक्के वाढण्याचा संभव आहे.

(https://www.usda.gov/oce/commodity/wasde). याचे एक कारण म्हणजे चीनने सोयाबीनचे उत्पादन वाढवण्याचा व सोयापेंड वापर कमी करण्याचा केलेल्या निर्धार आहे. याचा परिणाम या दोन्ही पिकांच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर झाला आहे. CBOT मधील सोयाबीन नोव्हेंबर फ्यूचर्स किमती मेपासून घसरत आहेत; तसेच ICE मधील कापसाच्या डिसेंबर फ्यूचर्स किमतीसुद्धा मार्चपासून घसरत आहेत.

पुढील काही महिने या दोन्ही पिकांच्या किमतींवर लक्ष ठेवणे जरूर आहे. मुगाची आवक सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशमधील आवक सर्वाधिक आहे (६२ टक्के); त्या खालोखाल गुजरात (२० टक्के), राजस्थान (११ टक्के) व महाराष्ट्र (४ टक्के) ही राज्ये महत्त्वाची आहेत. मुगाच्या किमती नवीन हमीभावापेक्षा कमी आहेत.

२१ जून रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत ः

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) गेल्या सप्ताहात ०.४ टक्क्याने घसरून रु. ५५,९६० वर आले होते. या सप्ताहात ते ०.६ टक्क्याने वाढून रु. ५६,३०० वर आले आहेत. जुलै फ्यूचर्स भाव २.८ टक्के वाढून रु. ५७,७८० वर आले आहेत. सप्टेंबर फ्यूचर्स भाव रु. ५९,००० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.८ टक्के अधिक आहेत.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) या सप्ताहात १.८ टक्का वाढून रु. १,४७२ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४४० वर आले आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत. सध्याचे फ्यूचर्स भाव यापेक्षा कमी आहेत.

Cotton, Soybean
Cotton Seeds Sale : हिंगोलीत खरिपाच्या ३३ हजार क्विंटलवर बियाण्याची विक्री

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) या सप्ताहात रु. २,३५० वर आल्या आहेत. जुलै फ्यूचर्स किमती रु. २,३६३ वर आहेत. या वर्षासाठी हमीभाव रु. २,२२५ आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव यापेक्षा अधिक आहेत. पुढील महिन्यांसाठी व्यवहार अजून सुरू झाले नाहीत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात रु. १८,१७५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.७ टक्क्याने घसरून रु. १८,०५४ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. १७,३७४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर किमती रु. १८,१३० वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या ०.४ टक्का जास्त आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ६,८०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.५ टक्क्याने घसरून रु. ६,७०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,४४० आहे. हरभऱ्याची आवक कमी होऊ लागली आहे.

मूग

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ८,३५० वर आलेली आहे. मुगाचा चालू हंगामासाठी हमी भाव रु. ८,६८२ जाहीर झाला आहे. आवक आता वाढू लागली आहे.

Cotton, Soybean
Tur Market : अकोल्यात तुरीला सरासरी ११ हजारांचा दर कायम

सोयाबीन

या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) २.२ टक्के घसरून रु. ४,५४५ वर आली आहे. चालू वर्षासाठी हमीभाव रु. ४,८९२ आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ११,१३९ वर आली होती. या सप्ताहात ती ३.२ टक्क्यांनी घसरून रु. १०,७७९ वर आली आहे. तुरीचा चालू वर्षीचा हमी भाव रु. ७,५५० आहे. तुरीची आवक आता कमी होत आहे.

कांदा

कांद्याची (पिंपळगाव) किंमत गेल्या सप्ताहात सरासरी रु. २,५२० होती; या सप्ताहात ती रु. २,९०० वर आली आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. २,५०० वर आली होती. या सप्ताहात रु. ४,००० वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com