Orange Damage Compensation : संत्रा गळ झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा

Orange Fruit Farming : अति पावसामुळे संत्रा व मोसंबीची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. निवडणूक तोंडावर असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले.
Orange Farming
Orange Orchard DamageAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : अति पावसामुळे संत्रा व मोसंबीची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. निवडणूक तोंडावर असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेश दिले. परंतु ते वेळेत न झाल्याने नुकसानीचा अर्धवट अहवाल पाठविण्यात आला. त्या आधारे नरखेड तालुक्याला २८.८२ कोटी रुपये प्राप्तही झाले. परंतु या निधीच्या वितरणाचा मुहूर्त प्रशासनाला सापडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड व काटोल हे तालुके मोसंबी व संत्र्याच्या विक्रमी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व त्यातून होणाऱ्या फळगळतीमुळे या भागातील संत्रा व मोसंबी उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. नुकसानी संदर्भाने ओरड झाल्यानंतर शासनाने निवडणूक तोंडावर असल्याने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासनाला पाठविण्याचे आदेश घाईघाईत देण्यात आले.

Orange Farming
Orange Orchard : संत्रा फळबागांना विदेशी गुंतवणूकदारांची भेट

पण पंचनाम्याचे काम कासवगतीने झाले. अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार गळलेली फळे वेचून फेकून दिली होती. अशातच पंचनामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेतात किंवा बागेत काहीच आढळले नाही. त्यामुळेच सर्वेक्षण करणाऱ्या शासकीय यंत्रणेने अद्याप संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठविला नाही.

त्यांनी १६ ऑक्टोबरपर्यंत सर्व्हेक्षण झालेल्या शेतकऱ्यांचा नुकसानीचे अहवाल पाठविले व त्यानुसार नरखेड तालुक्याला २८.८२ कोटी रुपये प्राप्त ही झाले आहे. १६ ऑक्टोबरनंतर पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अहवाल उशिरा पाठविण्यात आले असल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळणार की नाही, याबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे.

Orange Farming
Orange Market : संत्रा विक्रीला आला वेग

पाच कोटी रुपयांची पुन्हा आवश्यकता

नरखेड तालुक्यातील संत्रा व मोसंबी फळगळीच्या नुकसान भरपाईसाठी आधी अपूर्ण अहवाल पाठविण्यात आला. त्या आधारे २८.८२ कोटी रुपये तहसील कार्यालयाला प्राप्त होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटून गेला. तलाठ्यांमार्फत शेतकऱ्यांकडून आधार व पासबुकच्या झेरॉक्स जमा करण्यात आल्या.

पण रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी पाच कोटी रुपये कमी पडत असल्याने अद्याप वाटप सुरू करण्यात आले नाही.

संपूर्ण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई एकाच वेळी वितरित करण्यासाठी पाच कोटी रुपये कमी पडत होते. यामुळे याची मागणी करण्यात आली आहे व पुढील आठवड्यात पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर लगेच शेतकऱ्यांना संपूर्ण निधीचे वितरण करण्यात येणार आहे.
- चरणसिंग ठाकूर, आमदार, काटोल विधानसभा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com