Nagar News : बांगलादेशात उद्भवलेल्या अस्थिरतेमुळे राज्यातील कांद्याला पुन्हा चांगला भाव मिळत आहे. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सरासरी कांद्याला साडेतीन हजार रुपयांचा भाव मिळाला.
कांद्याच्या २५ गोण्यांना अपवादात्मक ३६०० ते ३७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठवड्यात ३१०० ते ३२०० रुपयांपर्यंत दर मिळत होता. त्यात पाचशे रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
लिलावात पारनेर व अन्य ठिकाणी ३४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बांगलादेशात सध्या अस्थिरता आहे. त्याचा परिणाम कांदा दरावर होईल, असे वाटत होते. मात्र दरात उलट वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शनिवारी (ता. १०) नगर येथे नेप्ती उपबाजारात ६० हजार १९४ कांदा गोण्यांची (३३.१०७ क्विंटल) आवक झाली. कांद्याचे प्रतवारीनुसार एक नंबर कांद्याला ३ हजार १०० ते ३ हजार ५००, दोन नंबर कांद्याला २६०० ते २१००, तीन नंबर कांद्याला १९०० ते २६०० व चार नंबर कांद्याला एक हजार ते १९०० रुपयांचा भाव मिळाला आहे.
सध्या दक्षिणेतील राज्यात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे दक्षिणेतील नवीन कांदा बाजारात येण्यास सुरवात होणार आहे. त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर होण्याची शक्यता आहे. श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. ९) झालेल्या लिलावाला १६ हजार ४२४ कांदा गोणी आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला सर्वाधिक ३४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.
येथील बाजार समितीत झालेल्या लिलावात राज्याच्या विविध भागातून कांद्याची आवक झाली. कांद्याच्या प्रतवारीनुसार एक नंबर कांद्याला ३००० ते ३४००, दोन नंबर कांद्याला २४०० ते २९५०, तीन नंबर कांद्याला १७०० ते २३५०, गोल्टी कांद्याला २६०० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. टाकळीभान, ता. श्रीरामपूर येथील उपबाजार समितीमध्ये कांदा लिलावात ९०० गोण्यांची आवक झाली. कांद्याला ३३०० रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला.
पारनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. ९) कांद्याचे लिलाव झाले. येथील बाजार समितीत पारनेर तालुक्यासह राज्याच्या विविध भागातून कांद्याची एकूण १२७५० गोणी आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला सर्वाधिक तीन हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला.
कांद्याच्या प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल भाव ः
एक नंबर कांद्याला २९५० ते ३३००, दोन नंबर कांद्याला ः २५०० ते २९००, तीन नंबर कांद्याला २००० ते २४५०, गोल्टी कांद्याला २५०० ते ३१०० रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.